कर्जवसुलीत गेलं मल्ल्यांचं `किंगफिशर हाऊस`!

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 13:51

किंगफिशर एअरलाइन्सच्या विमानांनी कायमचं लॅन्डींग केलं असताना या कंपनीकडे असलेल्या ६,०७२ कोटी रुपयांच्या थकीत कर्जवसुलीसाठी मुंबई विमानतळावर असलेलं ‘किंगफिशर हाऊस’ बँकांनी आपल्या ताब्यात घेतलंय.

किंगफिशरच्या कर्मचा-यांची दिवाळी अंधारातच!

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 16:13

दिवाळीच्या आधीच दिवाळं निघालेली किंगफिशर एअरलाईन्सचे जवळजवळ ३००० कर्मचा-यांना यंदा मात्र अंधारातच दिवाळीत साजरी करावी लागतेय.

कर्मचाऱ्यांकडून सहयोग; कधी उडणार ‘किंगफिशर’?

Last Updated: Thursday, October 25, 2012, 15:47

अखेर गुरूवारी किंगफिशर एअरलाईन्स आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाटाघाटी झालीय. या वाटाघाटीनुसार आजपासून म्हणजेच गुरुवारपासून सुट्टीवर गेलेले कर्मचारी पुन्हा कामावर हजर होत आहेत.

किंगफिशरचे कर्मचारी उपाशी, मल्ल्या पितापुत्रांची अय्याशी

Last Updated: Monday, October 22, 2012, 15:16

सरकारनं विजय मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाईन्सचे पंख छाटले खरे मात्र याचा मल्ल्या परिवारावर काहीही फरक पडलेला नाही. किंगफिशर एअरलाईन्समध्ये काम करणा-या हजारो कर्मचा-यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. मल्ल्या पिता-पुत्र मात्र परदेशात 2013 च्या दिनदर्शिकेसाठी नव्या दमाच्या मदनिकांच्या निवडीसाठी परदेशात आहेत.

किंगफिशर एअरलाईन्सला दणका

Last Updated: Saturday, October 20, 2012, 16:04

कर्जाच्या खाहीत लोटलेल्या आणि कर्मचाऱ्यांचे पगार थकविलेल्या किंगफिशर एअरलाईन्सला मोठा दणका मिळाला आहे. किंगफिशरचा नागरी हवाई परवाना रद्द करण्याचा निर्णय आज शनिवारी नागरी उड्डाण महासंचालकांनी घेतला आहे.

किंग ऑफ `बॅड` टाइम्स

Last Updated: Saturday, October 6, 2012, 18:05

किंगफिशरच्या सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. सध्याच्या घडीला किंगफिशर एअरलाईन्सच्या नुकसानाचा आकडा तब्बल 8 हजार कोटी इतका आहे. तर विविध बँकांनी दिलेल्या कर्जाचा बोजा 7 हजार कोटींचा आहे. किंगफिशरच्या ताफ्यात असलेल्या 63 विमानांपैकी आता फक्त दहाच विमानं उरली आहेत.

किंगफिशरचे ओझे, महिलेची आत्महत्या

Last Updated: Friday, October 5, 2012, 12:21

डबघाईला आलेल्या किंगफिशर एअरलाईन्समधील आर्थिक संकट आता कर्मचा-यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवावर बेतू लागलय. कंपनीनं पगार रखडवल्यानं आलेला आर्थिक ताण सहन न झाल्यानं किंगफिशरमधील एका कर्मचा-याच्या पत्नीनं आत्महत्या केलीय.

'किंग' मल्ल्या दिवाळखोरीत, घरांचा लिलाव

Last Updated: Thursday, July 5, 2012, 18:39

किंगफिशरचे सर्वेसर्वा विजय मल्‍ल्‍यांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. एअरलाईन्सचे किंग म्हणून ओळखलेले जाणारे मल्ल्या दिवाळखोरीत आलेत. हे संकट एअरलाईन्समुळे ओढवले आहे. दिवाळखोरीतून बाहेर पडण्यासाठी मल्ल्यांना चक्क घरांचा लिलाव करावा लागण्याची वेळ आली आहे.

माल्यांचा 'किंगफिशर एअरलाइन्स'ला 'टाटा'?

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 17:21

‘किंगफिशर’ला वाचवण्यासाठी विजय माल्या टाटा समूहाबरोबर चर्चा करत आहेत. झी २४ तासला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार याबाबत विजय माल्या यांनी टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांच्याबरोबर दोन वेळा चर्चा केली आहे.

'किंगफिशर एअरलाइन्स'ला दिलासा

Last Updated: Thursday, March 8, 2012, 19:57

इंधनाचा पुरवठा होऊ न शकल्याने किंगफिशर एअरलाइन्सची बुधवारी रात्रीची तीन उड्डाणे रद्द करण्यात आली. एका उड्डाणाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. दरम्यान, इंधन पुरवठा आज सकाळी सुरळीत झाल्यानंतर किंगफिशर एअरलाइन्सला दिलासा मिळाला.

किंगफिशरचे आता काही खरं नाही

Last Updated: Thursday, March 8, 2012, 09:36

किंगफिशरच्या अडचणींमध्ये अधिकच भर पडली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने बुधवारपासून कंपनीचा इंधन पुरवठा बंद केला आहे. आर्थिक आरिष्टात सापडलेल्या किंगफिशरने इंधन पुरवठ्याचे पैसे कंपनीला अदा न केल्याने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. किंगफिशरला त्यामुळे मुंबईतील सहा उड्डाणं रद्द करावी लागली आणि दिल्लीतही त्याचा फटका बसला.

किंगफिशरच्या पंखातलं बळ संपलं

Last Updated: Sunday, February 19, 2012, 16:38

किंगफिशर एअरलाईन्सच्या एका विचित्र निर्णयामुळे प्रवाशआंना बराच मनस्ताप सहन करावा लागला. किंगफिशरनं अचानक मुंबईतली 16 उड्डाणे रद्द केली आहेत त्याचबरोबर काही उड्डाणं उशिरानंही होत आहेत.

एअर इंडियाचा महाराजा झाला सांताक्लॉज

Last Updated: Sunday, December 25, 2011, 18:31

एअर इंडियाचा महाराजा म्हातारा झाला असला आणि त्याचे संस्थान खालसा झालं असली तरी आजही तो महाराजाच आहे हे त्याने दाखवून दिलं आहे. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर त्याने मल्ल्यांच्या किंगफिशर मधील ३६ हवाईसुंदरींना मोठ्या मनाने आपल्या दरबरात पदरी ठेवून घेतलं आहे.

किंगफिशरच्या अडचणीत भर, कंपनीला घरघर

Last Updated: Friday, November 11, 2011, 15:15

आर्थिक आरिष्टात सापडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सला सरकारकडून कोणत्याही स्वरुपाचे सहाय्य मिळण्याची शक्यता नागरी उड्डाण मंत्री वायलर रवी यांनी फेटाळून लावली. पण किंगफिशला आर्थिक सहाय्या मिळण्यासाठी बँकाकडे जाण्याची मूभा असल्याचं वायलर रवी यांनी सांगितलं.

किंग ऑफ बॅड टाईम्स

Last Updated: Friday, November 11, 2011, 15:13

किंगफिशर एअरलाईन्सचा संचित तोटयाने तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळेच नागरी उड्डाण मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाला आर्थिक आरिष्टात सापडलेल्या किंग फिशरला सहाय्या करावे अशी विनंती करावी लागली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाला एटीएफ म्हणजे एविएशन टरबाईन फ्युल टॅक्सेसमध्ये कपात करावी अशी विनंती केली.