लालबागच्या मुजोर दोषी कार्यकर्त्यांवर कारवाई – आर आर

Last Updated: Saturday, September 28, 2013, 15:37

लालबागच्या राजाचे दर्शन घेणाऱ्या महिला तसेच इतर भाविकांसोबत गैरवर्तन करणाऱ्या कार्यकर्त्यांची चौकशी पूर्ण झालेली आहे. त्यातील काहींवर कारवाई झालेली आहे. उरलेल्या दोषींवरही लवकरच कारवाई करण्यात येईल, असं गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सांगितलंय.

लालबागच्या राजाच्या मुजोर मंडळाने केली सर्वाधिक वीजचोरी

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 18:56

गणेश भक्तांशी मुजोरी करणा-या आणि पोलिसांनाही मारहाण करण्यापर्यंत मजल मारणाऱ्या `लालबागचा राजा` गणेशोत्सव मंडळाने सर्वाधिक वीजचोरी केल्याचे उघड झालं आहे.

सोशल नेटवर्किंग साईटवर एक व्हिडिओ क्लिप चर्चेची

Last Updated: Friday, September 20, 2013, 08:21

गणेशोत्सवाच्या धामधुमीत राज्यातील अनेकांच्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर एक व्हिडिओ क्लिप चर्चेची विषय ठरली. लालबागच्या राजाचे मुजोर कार्यकर्ते सामान्य भाविकांशी कसे वागतात? त्याचं दर्शन घडविणारी ही क्लिप होती.

बाप्पाला निरोप : मुंबई-पुण्यातील रस्ते फुलले, लालबाग राजाचे विसर्जन

Last Updated: Thursday, September 19, 2013, 09:22

मुंबई आणि पुण्यात गणरायाच्या विसर्जनाचा दरवर्षीप्रमाणे यंदाही अभूतपूर्व उत्साह होता. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई आणि पुण्याचे रस्ते गणेशभक्तांनी फुलले होते. मुंबईत लालबागचा राजा आणि पुण्यात दगडूशेठ गणपतीचं विसर्जन करण्यात आलंय.

लालबागचा राजा : मुजोर कार्यकर्त्यांची गंभीर दखल - पोलीस आयुक्त

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 11:43

लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मुजोर वर्तनाची गंभीर दखल आता मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनीही घेतली आहे. लालबागचा राजा मंडपात लावलेल्या सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलीस करणार आहेत.

लालबागमधील मुजोरी : राज ठाकरेंच्या सूचनेकडे दुर्लक्ष

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 23:55

राजाच्या दरबारात सुरु असलेल्या कार्यकर्त्यांच्या दादागिरीच्या वृत्ताची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दखल घेतलीय..

लालबाग राजा : महिला कार्यकर्तीकडून महिला पोलिसाला मारहाण

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 15:21

पोलिसांना मारहाण केल्यानं एका कार्यकर्त्याला अटक झाल्या ‘लालबागचा राजा’ मंडळाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी सुरुच आहे. आता पुन्हा एकदा याच मंडळातील एका कार्यकर्त्या महिलेनं एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं समोर आलंय.

नाठाळांचे माथी हाणू काठी

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 16:41

लालबागच्या राजाच्या दरबारात भक्तांवर मंडळाच्या कार्यकर्त्यांची अरेरावी धक्काबुक्कीच्या विरोधात ‘झी मीडिया’नं कुठल्याही दबावाला न झुकता वाचा फोडली आणि अनेकांनी आपल्याला आलेले अनुभव कथन केले. देवाला हाताशी धरून देवाचं मार्केटिंग करून कोट्यवधी रूपये भक्तांकडून मिळवून त्यांनाच दाबून मारण्याचा हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही, हे ‘झी २४ तास’नं ठणकावलं. सातत्यानं बातम्या दाखवल्यानंतर अखेर गृहमंत्री जागे झाले आणि कारवाईच आश्वासन दिलं. अर्थात कारवाई काय होते याकडेही आमचं लक्ष असणार आहेच.

लालबागच्या कार्यकर्त्यांची PSI ना मारहाण

Last Updated: Monday, September 16, 2013, 23:47

लालबागच्या कार्यकर्त्यांची मुजोरी थांबायला तयार नाही. आज दुपारी लालबाग मंडळाच्या एका कार्यकर्त्याने सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पीएसआय अशोक सरमळे यांना धक्काबुक्की केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय.

लालबागच्या कार्यकर्त्यांनी महिला कॉन्स्टेबलला केली मारहाण?

Last Updated: Monday, September 16, 2013, 20:29

लालबागच्या राजाच्या मंडपात घडणा-या एकेक घटना सातत्यानं समोर येतायत. काल रात्री एका महिला कॉन्स्टेबलला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं आम्हाला समजलंय.

लालबागच्या मुजोर कार्यकर्त्यांसंदर्भात गृहमंत्र्यांच्या सूचना

Last Updated: Monday, September 16, 2013, 17:55

झी मीडियाच्या दणक्यानंतर आता राज्यकर्त्यांना जाग आलीये. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी लालबागच्या राजाच्या मंडपात भाविकांशी गैरवर्तन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश सहआयुक्तांना दिलेत.

लालबागचा राजा, नवसाची रांग आणि मी...

Last Updated: Saturday, September 14, 2013, 16:23

गणेशचतुर्थीचा आदला दिवस... रविवार... दुपारचा 1 वाजलेला... पण `लालबागचा राजा`च्या नवसाची रांग आमच्या शांतकिरण बिल्डिंगपर्यंत पोहोचलेली...

`लालबागच्या राजा`च्या दरबारात भाविकांना धक्के!

Last Updated: Friday, September 13, 2013, 12:09

ही एक अशी बातमी आहे, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकेल. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती मिळवणाऱ्या सुप्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांशी कसं वर्तन केलं जातं, हे उघड करणारी दृश्यं आम्ही तुम्हाला दाखवत आहोत.

राज्यात सर्वत्र बाप्पाच्या उत्साहाला उधाण

Last Updated: Tuesday, September 10, 2013, 07:32

राज्यात सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची धूम आहे. मुंबईतर रात्रीपासून बाप्पाचा जयघोष सुरु आहे. मराठी भाषिकांचा प्रभाव असलेल्या लालबाग, चिंचपोकळी, परळ, दादर परिसरात तर उत्साहाला उधाण आलं होतं. उपनगरातही बाप्पाचं जोरदार स्वागत होतंय.

लालबागचा राजा दर्शन, गणपती बाप्पा मोरया

Last Updated: Sunday, September 15, 2013, 23:01

घ्या लालबागच्या राजाचं LIVE दर्शन