जिया आत्महत्या प्रकरणात सलमानचंही नाव, salman khan name involved in jiah khan suicide case

जिया आत्महत्या प्रकरणात सलमानचंही नाव

जिया आत्महत्या प्रकरणात सलमानचंही नाव
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

जिया खान आत्महत्या प्रकरणातील एक एक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आता याच प्रकणात अभिनेता सलमान खान याचंही नाव पुढे आलंय. महत्त्वाचं म्हणजे, जियाची आई राबिया खान यांनी या प्रकरणात सलमानचंही नाव घेतलंय.

राबिया खान यांनी जिया हिचं सहा पानांचं सुसाईड नोट जाहिर करताना सलमानच्या नावाचाही उल्लेख केला. सुसाईड नोटमध्ये जियानं सूरजचं नाव घेतलं नसलं तरी तिचा सगळा रोख सरळ सरळ सूरजवरच आहे. सूरजलाच जियानं आपल्या आत्महत्येसाठी जबाबदार धरलंय. सूरजच्या मानसिक आणि शारिरीक प्रतारणेमुळे जियानं आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. या सुसाईड नोटच्या साहाय्यानंच पोलिसांनी सूरजला अटक केलीय.

याचसंबंधी बोलताना जियाच्या आईनं एका वर्तमानपत्राशी बोलताना सलमानचं नावही घेतलंय. ‘आदित्य पांचोली यांना जिया आणि सूरजचे नातेसंबंध पसंत नव्हते. जेव्हा त्याला त्यांच्या संबंधांबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्याला खूप राग आला होता. त्यानंतर त्यांनी जिया-सूरज यांचे संबंध तोडण्याचा पूरेपूर प्रयत्नही केला’ असं राबिया यांनी म्हटलंय.

सलमान आणि आदित्य खास मित्र आहेत. त्यामुळे आदित्यच्या सांगण्यावरून सलमाननंही सूरजला जियाशी असलेले संबंध तोडून लांब राहण्याचा सल्ला दिला होता. पण, तेव्हा मात्र सूरजनं आपण जियावरच प्रेम करत असल्याचं सांगितल्यानं नंतर सलमाननं हा नाद सोडून दिला.

सलमान खान सूरजला ‘हिरो’च्या रिमेकमधून लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आदित्यला आपल्या मुलानं आपल्या करिअरकडे लक्ष द्यावं असं वाटत होतं, त्यामुळेच त्यानं सलमानची मदत घेतली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 11, 2013, 15:25


comments powered by Disqus