अंदमान बोट अपघात: हेल्पलाईन नंबर

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:42

अंदमान निकोबारमध्ये प्रवासी बोट बुडाल्यानं झालेल्या अपघातामध्ये २१ जणांना जलसमाधी मिळालीय. नॉर्थ बे बेटाजवळ अक्वा मरिना ही प्रवासी बोट बुडाली. या बोटीवर ४० प्रवासी असल्याची माहिती मिळतेय. तामिळनाडू आणि मुंबईतल्या काही प्रवाशांसह क्रू मेंबरचा या प्रवाशांमध्ये समावेश होता.

वीणा मलिक लवकरच देणार गोड बातमी?

Last Updated: Tuesday, November 19, 2013, 15:32

बिग बॉसच्या चौथ्या सीझनमधून झळकणारी पाकिस्तानी मॉडेल वीणा मलिक अनेकदा आपल्या हॉट अदांसाठी चर्चेत येते.

अभिनेते दिलीप कुमार यांना मिळाला डिस्चार्ज

Last Updated: Thursday, September 26, 2013, 20:32

हृदयविकाराचा झटका आल्यानं उपचारांसाठी मुंबईच्या लीलावती इस्पितळात दाखल असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना इस्पितळातून घरी सोडण्यात आलं आहे.

इस्पितळातून गुरुवारी घरी जाणार दिलीप कुमार

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 17:54

हृदयविकाराचा झटका आल्यानं उपचारांसाठी मुंबईच्या लीलावती इस्पितळात दाखल असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना बहुदा उद्या(गुरुवार) इस्पितळातून घरी सोडण्यात येणार आहे.

‘त्या’ चिरमुडीनं वाचवले दीडशे जणांचे प्राण!

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 10:41

शनिवारची सकाळ मुंब्र्यासाठी धक्कादायक ठरली. मुंब्र्यातली बानो इमारत पत्त्यासारखी कोसळली... सकाळी उजाडत असतानाच ही दुर्घटना घडली. पण त्यावेळीही बहुतेक जणांचे प्राण वाचले ते आठ वर्षांच्या एका चिमुरडीमुळे...

मुंबईत चालत्या रेल्वेत तरूणीची छेडछाड, फेकण्याचा प्रयत्न

Last Updated: Saturday, July 27, 2013, 11:00

मुंबईत चालत्या रेल्वेमध्ये महिलांच्या डब्यात घुसून तरूणीची छेडछाड करण्याचा प्रकार आज पहाटे ५.३० ते ६ वाजण्याच्या दरम्यान घडला. तरूणींने जोरदार आरडाओरडा केल्याने अन्य प्रवासी मदतीसाठी धाऊन आलेत. दरम्यान, छेडछाडीनंतर या तरूणीला चालत्या ट्रेनमधून फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

चीनकडून आता भारतीय बनावट नोटा

Last Updated: Tuesday, July 16, 2013, 13:33

आधी पाकिस्तान आणि आता चीन. भारताची अर्थव्यवस्था कशी कोसळेल हा या दोन्ही देशांचा हेतू आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी आधी पाकिस्तानमधून भारतीय बनावट नोटा येत होत्या. मात्र, आता चीनही याच मार्गावर चालतोय. चीनमधून मोठ्या प्रमाणात भारतीय बनावट नोटा पाठवण्याचे काम सुरु आहे.

उत्तराखंड : रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण, अंत्यसंस्कार सुरू!

Last Updated: Thursday, June 27, 2013, 16:35

उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये लष्काराचं रेस्क्यू ऑपरेशन फत्ते झालंय. परंतु, पुराच्या गाळात अडकलेले शव मात्र अजूनही तिथंच फसलेले आहेत. हे शव बाहेर काढण्याचं काम आता प्रशासनाला करायचंय.

घोड्यांची दुर्दशा

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 23:24

समुद्र किनारा असो की एखादं छोटं गाव...घोडागाडी तुम्हाला दिसणारच..कुठ पर्यटकांना सैरसपाटा मारण्यासाठी तिचा वापर होतो तर कुठं प्रवासासाठी वाहतूकीचं साधन म्हणून घोडागाडी वापरली जाते...पण त्या घोडागाडीला जुंपलेल्या घोड्याची काय अवस्था असते याचा कुणीच विचार करत नाही..त्यामुळेच या रुबाबदार प्राण्याची दुर्दशा झालीय...

हा `वाघ` कधीच म्हातारा होणार नाही!- अनुपम खैर

Last Updated: Friday, November 16, 2012, 13:34

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आल्यानंतर शिवसैनिकांमध्ये पुन्हा एकदा उत्साह संचारला आहे.

पूजाने चेतेश्वर पुजाराला केले क्लिन बोल्ड

Last Updated: Thursday, November 8, 2012, 11:01

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रवी शास्त्री यांचा २२ वर्षांचा संसार मोडण्याच्या तयारीत असताना टीम इंडियाचा उगवता तारा चेतेश्वर पुजाराचा साखरपुडा झाला आहे. चेतेश्वरची विकेट पूजा हीने घेतली आहे.

आसाममध्ये नौका उलटून १०० मृत्युमुखी

Last Updated: Tuesday, May 1, 2012, 10:47

आसामध्ये नौका दुर्घटनेत १०० जणांचा बळी गेल्याची घटना घडली तर १०० पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. आसाममधील हा सर्वात मोठा अपघात आहे.

वयात होते वाढ, तशी झोप लागते गाढ

Last Updated: Friday, March 2, 2012, 16:39

आत्तापर्यंत असं मानलं जात होतं की जसजसं माणसाचं वय वाढतं, तसतशी त्याची भूक, झोप कमी होते. पण, नुकत्याच एका संशोधनातून समोर आलं आहे की वाढत्या वयानुसार झोपही वाढू लागते आणि अधिक शांत झोप लागते.

ऑस्ट्रेलियात जहाजाला जलसमाधी

Last Updated: Thursday, February 2, 2012, 13:41

ऑस्ट्रेलियात जवळपास ३५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या जहाजाला जलसमाधी मिळाल्याची भिती वर्तविण्यात आली आहे. या वृत्ताला ऑस्टेलियाचे पंतप्रधान जुलिया गिलर्ड यांनी दुजोला दिला आहे. ही घटना पपुआ नवी गुईनी येथे घडली.

ऑलिंपीक संघटनेच्या हरकतीनंतर 'डाऊ' बॅकफूटवर

Last Updated: Sunday, December 18, 2011, 18:33

डाऊ केमिकलने लंडनच्या ऑलिंपीक स्टेडियमच्या सभोवताली लोगो काढण्याचे मान्य केलं आहे. पण त्याने इंडियन ऑलिंपीक असोशिएशन समाधानी झालं नाही. अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी डाऊने २०१२ सालच्या ऑलिंपीकचे प्रायोजकपद काढून घ्यावं असं इंडियन ऑलिंपीक असोशिएशनचे मत आहे.

नालासोपारामध्ये ७० ते ८० रिक्षांची तोडफोड

Last Updated: Sunday, December 4, 2011, 05:56

नालासोपारामध्ये ७० ते ८० रिक्षांची आणि ७ ते ८ टेम्पो फोडल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री आयोळे परिसरात ही घटना घडली. अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्रीच्या सुमारास ही तोडफोड केली.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना रडवले

Last Updated: Tuesday, October 18, 2011, 15:20

अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील परतीच्या पावसानं भात शेतीला मोठा फटका दिला आहे. पावसामुळे 30 हजार हेक्टर पैकी 20 ते 25 हेक्टर भातशेतीचं नुकसानं झालं आहे.