दिलदार सलमानकडून लेखकाला महागडी वस्तू भेट!

Last Updated: Saturday, June 14, 2014, 17:28

सलमान खानचा दिलदार स्वभाव तर सगळ्यांनाच माहित आहे. त्यानं यावेळी चक्क स्वत:च घडयाळ भेट म्हणून दिलंय. सलमानचा आगामी चित्रपट `किक`चा डायलॉग रायटर रजत अरोराला त्यानं आपल्या हातातलं घडयाळ भेट केलंय.

लोणावळ्यात चित्रपट लेखिकेचा विनयभंग

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 18:44

चित्रपट लेखिकेचा लोणावळ्यात विनयभंग झाल्याची घटना लोणावळ्यात घडली आहे. चित्रपटात काम मिळवून देतो, असं आमीष दाखवून या भामट्यांनी या तरूणीला फसवलं आहे.

सलग ३० तास काम केल्यानं कॉपीरायटरचा मृत्यू

Last Updated: Thursday, December 19, 2013, 13:05

मेहनत केल्यानं कोणी मरत नाही, अशी म्हण असते. मात्र मेहनत केल्यानं एकाचा मृत्यू झालाय. सलग ३० तास काम केल्यानं इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथल्या कॉपीरायटरचा मृत्यू झाला. ही महिला कॉपीरायटर असून ती ३० तास काम करत असतांना अजिबात झोपलेली नव्हती.

ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांचं निधन

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 10:57

ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांचं आज सकाळी डोंबिवलीत निधन झालं. शंना यांचे वृद्धापकाळाने निधन झालं. लेखक, नाटककार अशी त्यांची ओळख होती.

अफगाणिस्तानात भारतीय लेखिकेची गोळ्या घालून हत्या

Last Updated: Friday, September 6, 2013, 08:43

भारतीय लेखिका सुश्मिनता बॅनर्जी यांची काबुलमध्येच तालिबान्यांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यांनी अफगाणिस्तानात तालिबानी सत्ता असताना आलेल्या अनुभवांवर आधारीत दोन पुस्तके लिहिली आहेत.

गुलजार यांचे ७९ व्या वर्षात पर्दापण

Last Updated: Sunday, August 18, 2013, 18:22

बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचा आज ७९ वा जन्मदिवस आहे. गुलजार यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... खूप कमी लोकांना त्याचे खरं नाव माहित आहे. त्यांचं खरं नाव संपूर्ण सिंह कालरा असं आहे.

लेखक बनतात मोठ्या प्रमाणावर स्किझोफ्रेनियाचे रुग्ण

Last Updated: Saturday, October 20, 2012, 10:04

मानसिक आजारांवर संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या असं लक्षात आलंय, की लेखन करणाऱ्या व्यक्तींना इतर काम करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत मानसिक आजारांवर जास्त प्रमाणात उपचार करावा लागतो. या अध्ययनामुळे लेखन आणि स्किझोफ्रेनियातील परस्पर संबंधातील अभ्यास करण्यात आलाय.

साहित्यातील नोबेल चीनच्या मो यान यांना

Last Updated: Thursday, October 11, 2012, 21:43

जागतिक क्षेत्रात मानाचा समजला जाणारा साहित्यातील २०१२ या वर्षाचा नोबेल पुरस्कार चीनचे लेखक मो यान यांना जाहीर झाला आहे. स्वीडीश अकादमीने आज स्टॉकहोम येथे या पुरस्काराची घोषणा केली. विज्ञान, साहित्य आणि शांततेसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतो.

इंग्रजी लेखक ख्रिस्तोफर यांचे निधन

Last Updated: Sunday, December 18, 2011, 16:00

इंग्लंडमधील प्रसिद्ध इंग्रजी लेखक, समीक्षक, स्तंभलेखक आणि पत्रकार ख्रिस्तोफर हिचन्स (६२) यांचे गुरूवारी निधन झाले. त्यांनी कॅन्सरशी शेवटपर्यंत लढत दिली.

चहावाला नव्हे तर 'सरस्वती'चा उपासक

Last Updated: Thursday, November 24, 2011, 17:12

लक्ष्मण रावांना लहानपणापासूनच वाचनाची विलक्षण आवड आणि हिंदी साहित्याची ओढ होती. त्यामुळेच त्यांनी हिंदी माध्यमातून १९७३ साली मॅट्रिकची परिक्षा दिली. गुलशन बावरांच्या कादंबऱ्यांनी त्यांना वेड करुन सोडलं. रावांना परिस्थिती अभावी शिक्षण सोडून स्पिनिंग मिलमध्ये नोकरी धरावी लागली. पण तरीही ते अवस्थ होते, कारण आतंरिक लिखाणाची ओढ त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती.