ऐन प्रजासत्ताक दिनी मणीपूर बॉम्बस्फोटांनी हादरलं

Last Updated: Sunday, January 26, 2014, 15:31

मणीपूरची राजधानी इन्फाळमध्ये आज सकाळी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू असताना दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले. बॉम्ब स्फोटांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ९ जण जखमी झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिलीय.

गोव्यात काँग्रेसच्या राज्यात भाजप

Last Updated: Tuesday, March 6, 2012, 11:10

मागील निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवत आपल्याकडे सत्ता खेचून आणली. हाच कित्ता आता भाजपने गिरवल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री दिंगबर कामत यांना पुन्हा सत्तेत बसण्यापासून भाजपने रोखण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात सन्नाटा पसरला आहे.

LIVE- पाहा कोणत्या राज्यात कोण हरलं, कोण जिकलं

Last Updated: Tuesday, March 6, 2012, 19:52

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सत्ताधारी बहुजन समाज पक्षाला जबरदस्त हादरा बसला असून समाजवादी पक्षाने मुसंडी मारली आहे. समाजवादी पक्षाने २०२ या मॅजिक फिगरच्या पुढे २१६ जागांवर आघाडी घेतली आहे.

पाच राज्य़ांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू

Last Updated: Tuesday, March 6, 2012, 08:19

देशातील उत्तर प्रदेशसहित उत्तराखंड, पंजाब, मणीपूर आणि गोवा या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. गोवा राज्यात भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर आघाडी मिळाली आहे. तर युतीत सपा ४ जागांवर पुढे आहे.

निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर ?

Last Updated: Saturday, December 24, 2011, 16:22

निवडणूक आयोग पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर, पंजाब आणि गोवा राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये फेब्रुवारीत पाच टप्प्यात निवडणुका होतील अशी शक्यता आहे. इतर चार राज्यांमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होतील. मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय.कुरेशी या संबंधी घोषणा करतील आणि त्यानंतर या पाच राज्यांमध्ये आचार संहिता लागु होईल.