प्रणवदा राष्ट्रपतीपदावर विराजमान

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 15:21

भारताचे नवे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ ग्रहण केलीय. प्रणव मुखर्जी यांनी भारताचे १३ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलीय. भारताचे सरन्यायाधीश एच. एस. कपाडिया यांच्याकडून त्यांनी शपथ घेतली.

प्रणवदा आज घेणार शपथ

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 08:28

प्रणव मुखर्जी आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. भारताचे सरन्यायाधिश एच. एस. कपाडिया प्रणव मुखर्जी यांना शपथ देतील.

राष्ट्रपतीपदी प्रणव मुखर्जी विराजमान

Last Updated: Sunday, July 22, 2012, 18:00

राष्ट्रपती निवडणुकीत युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांनी सहज विजय संपादन केला. त्यानी एनडीएचे उमेदवार पी.ए.संगमा यांचा पराभव केला आहे.

उपराष्ट्रपतीपदासाठी अन्सारींचा अर्ज दाखल

Last Updated: Thursday, July 19, 2012, 09:01

उपराष्ट्रपतीपदाचे युपीएचे उमेदवार म्हमून हमीद अन्सारींनी अर्ज दाखल केलाय. यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि युपीएतल्या घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र यावेळी तृणमुल काँग्रेसचा एकही प्रतिनिधी हजर नव्हता.

राष्ट्रपती निडवणुकीचे आज मतदान

Last Updated: Thursday, July 19, 2012, 12:03

राष्टपतीपदासाठी आज निवडणूक होतेय. प्रणव मुखर्जी आणि पी. ए. संगमा यांच्यामध्ये राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक आहे. यामध्ये प्रणवदांचं पारडं जड दिसतंय.

मुखर्जी-पवार घेणार शिवसेनाप्रमुखांची भेट

Last Updated: Friday, July 13, 2012, 08:52

राष्ट्रपतीपदाचे युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहेत. रात्री आठ वाजता मातोश्रीवर ही भेट होणार आहे.

राष्ट्रपतीपदाचे दावेदार; आज करणार अर्ज दाखल

Last Updated: Thursday, June 28, 2012, 09:16

राष्ट्रपतीपदासाठी युपीएचे उमेदवार माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि विरोधी पक्षांचे उमेदवार पी.ए.संगमा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

संगमांचं जेडीयू-सेनेला पाठिंब्यासाठी आवाहन...

Last Updated: Thursday, June 21, 2012, 19:03

आज दुपारी भाजपनं पी. संगमा यांना पाठिंबा जाहीर केला. भाजपनं जाहिर केलेल्या पाठिंब्यामुळे पी. संगमा यांचा आत्मविश्वासही दुणावलाय. भाजपनंतर आता जेडीयू आणि शिवसेनेलाही समर्थनासाठी गळ घातलीय.

एनडीएची बैठक निष्फळच

Last Updated: Sunday, June 17, 2012, 21:25

राष्ट्रपतीपदी प्रणव मुखर्जींची सर्वसंमतीनं निवड होणार की नाही याबाबतचं चित्र आजही स्पष्ट होऊ शकलं नाही. या निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी एनडीएनं बोलावलेली बैठक आज कोणताही निर्णय न होताच संपली.

...अशी झाली मुखर्जींच्या नावाची घोषणा

Last Updated: Saturday, June 16, 2012, 08:30

शुक्रवारचा दिवस दिल्ली दरबारी धावपळीचा ठरला. सकाळपासून ते प्रणव मुखर्जींची उमेदवारी जाहीर होईपर्यंत काय काय घडलं त्यावर एक नजर टाकूयात…

राष्ट्रपतीपदावरून खल सुरूच, एनडीएची बैठक सुरू

Last Updated: Friday, June 15, 2012, 12:58

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावरुन ममता आणि काँग्रेसमध्ये सुरु झालेला वाद एनडीएच्या पथ्यावर पडण्याची शक्यता निर्माण झालीय. बदलेल्या समीकरणातच आज एनडीएची बैठक होणार आहे.

'२०१४ पर्यंत मनमोहन सिंग हेच पंतप्रधान'

Last Updated: Thursday, June 14, 2012, 14:36

राष्ट्रपतीपदाची निवडणुकीवरून दिल्लीतल्या घडामोडींना वेग आलाय. २०१४पर्यंत मनमोहन सिंग हेच पंतप्रधान राहतील, असं काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे मनमोहन सिंग यांचं नाव राष्ट्रपतीच्या स्पर्धेतून बाहेर पडल्याचं स्पष्ट झालंय.

प्रणव मुखर्जींचा काबूल दौरा रद्द

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 11:46

केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचा काबुल दौरा रद्द झालाय. 14 जूनला प्रणव मुखर्जी काबूलच्या दौ-यावर जाणार होते. मात्र ऐनवेळी हा दौरा रद्द करण्यात आलाय. सोमवारी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रणव मुखर्जी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.