प्रेमाचा विरोध केला म्हणून आईला पाजला विषारी चहा

Last Updated: Friday, March 14, 2014, 18:19

मुरादाबादच्या मझोला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शाहपूर इथं एक धक्कादायक प्रकार घडलाय. प्रेमाला विरोध करणाऱ्या आईला मुलीनं विषारी चहा पाजला. गुरूवारी सकाळी हा प्रकार घडल्यानंतर महिलेच्या शेजाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती केलंय. त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे.

काँग्रेस सर्वात जास्त विषारी - नरेंद्र मोदी

Last Updated: Sunday, February 2, 2014, 16:22

काँग्रेस पक्ष सर्वात जास्त विषारी असल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. सोनिया गांधी यांनी यापूर्वी काही लोक विषाची शेती करतात अशी टीका केली होती. या टीकेला नरेंद्र मोदी यांनी आज मेरठच्या सभेत उत्तर दिलं आहे.

महिलांनो सावधान... गोरं करणाऱ्या क्रीममध्ये विषारी धातू

Last Updated: Thursday, January 16, 2014, 16:09

सध्या बाजारात अशा अनेक सौंदर्य क्रीम आहेत की ज्या लवकरात लवकर गोरं बनविण्याचा दावा करतात. मात्र अशा क्रीममुळं आपल्याला त्वचेचे गंभीर आजार होवू शकतात. त्यामुळं महिलांनो सावध राहा...

मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर पुन्हा विषारी मासे

Last Updated: Saturday, October 26, 2013, 15:45

मुंबईतील बीचवर फिरायला जाऊ नका, नाहीतर तुम्हाला धोक्याचा सामना करावा लागेल. जुहू समुद्र किनाऱ्यावर विषारी मासे दाखल झाले आहेत. त्यामुळे या माशांचा चावा तुमच्या जीवावर बेतला जाऊ शकतो.

विषारी दारूचे ३७ बळी

Last Updated: Saturday, October 19, 2013, 21:46

विषारी दारू प्यायल्यामुळे ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील मुबारकपूर परिसरात घडली आहे.

रंगबाधा प्रकरणी दोन जणांना अटक

Last Updated: Saturday, March 10, 2012, 15:33

धारावीतल्या विषारी रंगबाधाप्रकरणी दोन कारखाना मालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुश्ताक सत्तार सिद्दीकी आणि जाफर सत्तार सिद्दीकी अशी त्यांची नावं आहेत. धारावी पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलंय. मात्र अजूनही चार मालक अद्यापही फरार आहेत.

दारूने घेतला 'जीव' सरकारची फक्त 'चिव-चिव'

Last Updated: Thursday, December 15, 2011, 10:21

पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात विषारी दारुमुळं १२६ जणांचे मृत्यू झाले आहेत. याचा बाबतीत गुरवारी सात लोकांना अटक करण्यात आली आहे. या विषारी दारूमुळे आज तब्बल ४० लोकांनी आपला जीव गमावला आहे.

पश्चिम बंगालमध्ये विषारी दारु प्यायल्याने २० जण मृत्युमुखी

Last Updated: Wednesday, December 14, 2011, 14:26

पश्चिम बंगाल राज्याच्या मागे बहुधा शुक्लकाष्ठ लागलं असं दिसतंय. आधी सरकारी रुग्णालयात हलगर्जीपणमुळे नवजात बालकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले मृत्यु नंतर खाजगी हॉस्पिटलला लागेल्या आगीत जवळपास ९० जणांना आपले प्राण गमवावे लागले. आणि आता विषारी दारु प्यायाल्याने ३० लोकांचा मृत्यू ओढावला आहे