राम कदम यांचा वाढू शकतो तुरुंगवास?, ram kadam police custody increased

राम कदम यांचा वाढू शकतो तुरुंगवास?

राम कदम यांचा वाढू शकतो तुरुंगवास?

www.24taas.com, मुंबई
मुंबईतील वाहतूक शाखेचे पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी अटक झालेले आमदार राम कदम यांच्यासमोरील अडचणींत आणखी वाढ होण्याची चिन्ह आहेत.

घाटकोपर परिसरातील पंतनगर येथे शिधा पुरवठा अधिका-याला झालेल्या मारहाण प्रकरण त्यांच्या अंगाशी येणार असं चित्र आहे. कारण पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी राम कदम यांच्या कस्टडीची मागणी केलीये. दरम्यान, दुपारी दोन वाजता किला कोर्टात कदम यांना हजर केलं जाणार आहे.
माझी प्रगती अनेकांना खुपतेय – राम कदम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशिर्वादानं आपण मोठे होत असून आपली प्रगती कुणाच्या तरी डोळ्यात खुपतेय, अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार राम कदम यांनी दिलीय. त्यामुळे राम कदम यांचा नेमका रोख कुणावर होता? असा प्रश्न अनेकांना पडलाय.

‘जर एखादा पोलीस अधिकारी आमदाराशी असा वागत असेल तर तो सामान्यांसोबत कसा वागत असेल? ४०-५० जबाबदार आमदार संतप्त का होतात? याचाही विचार व्हायला हवा. माझ्यावर माझ्या पक्षाचे संस्कार आहेत... कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यावर हात न उचलण्याचे संस्कार माझ्या पक्षानं दिलेत... माझ्यावर अन्याय झालाय’असं म्हणत राम कदम यांनी आपण सचिन सूर्यवंशी यांच्यावर हात उगारलेला नाही याचा पुनरुच्चार केलाय.

First Published: Friday, March 22, 2013, 13:20


comments powered by Disqus