Last Updated: Thursday, March 28, 2013, 15:10
www.24taas.com, मुंबईनिलंबित आमदार क्षितीज ठाकूर यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्यासोबत माजी आमदार हितेंद्र ठाकूर, भाई ठाकूर हेदेखील होते. ठाकूर कुटुंब आणि राज यांच्यामध्ये सुमारे तासभर चर्चा झाली...
राज ठाकरे यांच्या भेटीचे नक्की कारण मात्र कळू शकलेले नाही. जवळजवळ एक तास राज ठाकरेंशी ठाकूर कुटुंबियांनी चर्चा केली. नुकताच झालेल्या पोलीस मारहाण प्रकरण यांतील प्रमुख आरोपी म्हणून क्षितीज ठाकूर यांना अटक केली होती.
तासभर झालेल्या या चर्चेत भाई, हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी राज यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतल्याने नव्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आता राज ठाकरेंची भेट का घेतली. आणि ठाकूर-ठाकरे भेटीचं नक्की निमित्त काय हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
First Published: Thursday, March 28, 2013, 15:03