पोलीस मारहाण : क्षितीज ठाकूर, राम कदम दोषी, Takur horizon, Ram Kadam guilty

पोलीस मारहाण : क्षितीज ठाकूर, राम कदम दोषी

पोलीस मारहाण : क्षितीज ठाकूर, राम कदम दोषी
www.24taas.com, मुंबई

पीएसआय मारहाणप्रकरणी निलंबित बविआचे आमदार क्षितीज ठाकूर आणि मनसे आमदार राम कदम यांना दोषी ठरविण्यात आलेय.

मुंबईतील वाहतूक शाखेचे पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना विधानभवनात मारहाण केल्याप्रकरणी क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांना निलंबित करण्यात आले होते. राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांनी सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याने त्यांच्यावर मरिन ड्राईव्ह पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या मारहाणीचे राज्यात तीव्र पडसाद उमटले होते.


आज गणपतराव देशमुख समितीचा अहवाल सादर करण्यात आला. देशमुख चौकशी समितीने दोन आमदारांना मारहाणप्रकरणी दोषी ठरविले. पीएसआय मारहाण घटनेला क्षितीज ठाकूर आणि राम कदम या दोन आमदारांना जबाबदार ठरविण्यात आले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. पोलिसांवर हात उगणाऱ्यांना पाठिशी घातले जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. यामध्ये मनसेचा आमदार असेल तर जरूर कारवाई करण्याचे स्पष्ट बजावले होते. गुन्हा दाखल केल्यानंतर दोन्ही आमदारांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांची जेलमध्ये रवानगी झाली होती. दोन्ही आमदारांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. कदम आणि ठाकूर यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांची १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली होती.

First Published: Wednesday, April 17, 2013, 13:32


comments powered by Disqus