मोदी `इलेक्शन मूड`मधून `गव्हर्नन्स मूड`मध्ये?

Last Updated: Wednesday, April 23, 2014, 10:14

मोदींच्या वागण्या बोलण्यात बदल जाणवतोय. मोदी `इलेक्शन मूड`मधून `गव्हर्नन्स मूड`मध्ये आलेत का? असा सवाल उपस्थित होतोय दुसरीकडे राहुल गांधीकडे लक्ष दिलं तर लक्षात येईल की, राहुल गांधींच्या भाषणातला आक्रमकपणा वाढलाय... का झाला दोघांच्या वागण्याबोलण्यातला बदल?

दिल्ली मेट्रोत 94 टक्के महिला खिसेकापू

दिल्ली मेट्रोत 94 टक्के महिला खिसेकापू

Last Updated: Wednesday, April 23, 2014, 09:18

जर तुम्ही दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करत असाल, तर जरा सावध राहण्याची गरज आहे. कारण दिल्लीत जानेवारी आणि मार्च महिन्यादरम्यान पकडण्यात आलेल्या खिसेकापूंमध्ये 94 टक्के महिला होत्या.

मोंदीकडे 500 कुर्ते, रोज बदलतात पाच - मुलायमसिंग

मोंदीकडे 500 कुर्ते, रोज बदलतात पाच - मुलायमसिंग

Last Updated: Wednesday, April 23, 2014, 08:41

भाजपचे नरेंद्र मोदी कपडे बदलण्यात जास्त वेळ घालवत आहेत. मोदींकडे 500 कुर्ते आहेत. ते रोज पाचवेळा बदलत असतात. मोदी हे नौटंकी करत आहेत. त्यांची ही नौटंकी मुलायम संपवून टाकतील, असे विधान समाजवादी पक्षाचे खासदार मुलायमसिंग यादव यांनी आझमगड येथे केले. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली.

 गिरीराज सिंहांना वादग्रस्त विधान भोवलं, प्रचारावर बंदी

गिरीराज सिंहांना वादग्रस्त विधान भोवलं, प्रचारावर बंदी

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 22:34

वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी भाजप नेते गिरीराज सिंग यांच्यावर निवडणूक आयोगानं निर्बंध लादलेत. त्यांना बिहार आणि झारखंडमध्ये प्रचारास बंदी घालण्यात आली असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. तसंच त्यांना स्वतंत्र कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीये.

भगवान बुद्धानंही सोडलं होतं पत्नीला, मोदींची भावाकडून पाठराखण

भगवान बुद्धानंही सोडलं होतं पत्नीला, मोदींची भावाकडून पाठराखण

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 21:31

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी सोमवारी मोदींच्या विवाहाबाबत त्यांची पाठराखण केलीय. ते म्हणाले, भगवान बुद्धानंही आपल्या पत्नीला सोडलं होतं, तेव्हा त्यांना कोणी नाही विचारलं की त्यांना का बरं हे पाऊल उचललं?.

मोदींनी जागा बळकावल्यानं जोशी खट्टू?

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 17:46

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी चांगलेच क्रोधीत झालेले दिसले.

नरेंद्र मोदींनंतर गुजरातचे मुख्यमंत्री कोण?

नरेंद्र मोदींनंतर गुजरातचे मुख्यमंत्री कोण?

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 17:17

भाजपनं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर आता एक नवा प्रश्न उपस्थित झालाय. मोदींनंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कोण होणार विराजमान? या प्रश्नाचं उत्तर आहे आनंदीबेन पटेल.

मोदींच्या नावे लिहिली `सुसाईड नोट`

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 16:23

गाजियाबादहून जवळच असलेल्या लोनीमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका व्यक्तीनं आत्महत्या करण्यापूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नावे एक `सुसाईड नोट` लिहून ठेवलीय.

सोने -चांदी दरात घसरण, कसा बसतोय फटका?

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 11:23

सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. नफेखोरीमुळे ही घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. जागतिक बाजारातील घडामोडी याला कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.

एका व्यक्तीसाठी स्वतंत्र मतदान केंद्र

एका व्यक्तीसाठी स्वतंत्र मतदान केंद्र

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 10:51

गुजरातमधील गिर अभयारण्यात केवळ एका मतदारासाठी उभारण्यात येणार असलेले स्वतंत्र मतदान केंद्र आयोगाच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचा एक उत्तम नमुना आहे. आशियायी सिंहांचा रहिवास असलेल्या गिरच्या अभयारण्यातील बनेज पाड्यावर राहणारे महंत भारतदास दर्शनदास यांच्यासाठी हे स्वतंत्र मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे.