मोदी-रजनी भेटीचं खाद्य, जोक्सचा बाजार गरम!

मोदी-रजनी भेटीचं खाद्य, जोक्सचा बाजार गरम!

Last Updated: Monday, April 14, 2014, 15:18

नरेंद्र मोदी असो किंवा रजनीकांत... दोघांचं व्यक्तीमत्व कल्पनेपेक्षा भारी... रजनीकांत आपल्या सिनेमांमुळे नाही तर त्यांचे सिनेमा त्यांच्या नावावर चालतात.. सध्या मोदींबाबत एक गोष्ट कानावर पडते की ते पक्षामुळे नाहीत.. तर पक्ष मोदींमुळे आज या स्थितीत आहे.. या दोघांची लोकप्रियता त्यांना सर्व क्षेत्रात मानली जाते.. मग ते जोक्स आणि विनोदाच्या दुनियेत कशी नसेल...

`देशात मोदींची नाही भाजपची लहर`

`देशात मोदींची नाही भाजपची लहर`

Last Updated: Sunday, April 13, 2014, 22:53

अबकी बार मोदी सरकारचा गजर सगळीकडं सुरुय. मात्र त्याच वेळी देशात मोदींची नाही भाजपची लहर आहे, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी केलीय.

सुपरस्टार रजनीकांत आणि नरेंद्र मोदींची भेट

सुपरस्टार रजनीकांत आणि नरेंद्र मोदींची भेट

Last Updated: Sunday, April 13, 2014, 19:29

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज सुपरस्टार रजनीकांत यांची चेन्नईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही खाजगी भेट असल्याचं बोललं जातंय.

वरूण गांधींचा मार्ग चुकलाय - प्रियंका गांधी

वरूण गांधींचा मार्ग चुकलाय - प्रियंका गांधी

Last Updated: Sunday, April 13, 2014, 18:48

प्रियंका वढेरा- गांधी अखेर वरूण गांधी यांच्याविषयी बोलल्या आहेत. आपला भाऊ वरूण गांधी याने राजकारणात चुकीचा मार्ग निवडला आहे, जनताच वरूणला योग्य रस्त्यावर आणेल, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलंय.

संजय बारू यांच्या पुस्तकासंदर्भात काँग्रेसचा प्रतिहल्ला

संजय बारू यांच्या पुस्तकासंदर्भात काँग्रेसचा प्रतिहल्ला

Last Updated: Sunday, April 13, 2014, 21:09

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांनी "दि ऍक्‍सिडेंटल प्राइम मिनिस्टर : दि मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहनसिंग` हे पुस्तक ऐन निवडणूकीच्या वातावरणात काढून विरोधकांच्या हातात आयतं कोलीतचं दिलंय.

 आश्चर्य! काँग्रेस खासदाराचं वय ५ वर्षांत ११ वर्षांनी वाढलं!

आश्चर्य! काँग्रेस खासदाराचं वय ५ वर्षांत ११ वर्षांनी वाढलं!

Last Updated: Sunday, April 13, 2014, 14:11

निवडणुकीतील उमेदवारांच्या मालमत्तेप्रमाणेच सध्या उमेदवारांचे वय देखील आश्चर्यकारकपणे वाढत आहे.

वरुण गांधींवरून वाद, प्रियंकाच्या टीकेवर मनेकाचा पलटवार

वरुण गांधींवरून वाद, प्रियंकाच्या टीकेवर मनेकाचा पलटवार

Last Updated: Sunday, April 13, 2014, 11:52

काँग्रेसची स्टार प्रचारक आणि काँग्रेस अध्यक्षा सोनियांची कन्या प्रियंका गांधी-वढेरानं सुल्तनापूरच्या जनतेला वरूण गांधींना पराभूत करण्याचं आवाहन करत नव्या वादाला तोंड फोडलंय. प्रियंकाच्या या आवाहनावर वरुणची आई मनेका गांधी यांनी प्रियंकावर पलटवार केलाय. मनेकानं म्हणटलं की देशाची सेवा करणं म्हणजे रस्ता भटकणं नाही. निवडणुकीनंतर तर हे जनताच दाखवून देईल.

छत्तीसगड येथील नक्षली हल्ल्यात 12 ठार

छत्तीसगड येथील नक्षली हल्ल्यात 12 ठार

Last Updated: Saturday, April 12, 2014, 22:37

छत्तीसगडमधील बिजापूर तालुक्यात निवडणूक अधिकारी पथकावर नक्षलवाद्यांनी जोरदार हल्ला केला. या हल्यात यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांसह राखीव दलाचे जवान ठार झालेत. मृतांचा आकडा 12 असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्यासाठी एक बस आणि अॅब्युलन्स वापरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेस प्रचारापासून मनमोहन सिंग लांबच

काँग्रेस प्रचारापासून मनमोहन सिंग लांबच

Last Updated: Saturday, April 12, 2014, 21:46

उगवत्याला नमस्कार करायचा, आणि मावळत्याकडे पाठ फिरवायची, राजकीय नेत्यांना हे मुळीच नवं नाही. असंच सध्या सुरू आहे काँग्रेसमध्ये. काँग्रेसच्या सभा, रॅलींमधून राहुल गांधी, सोनिया गांधी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर नेते दिसतायेत. मात्र दहा वर्षांपासून पंतप्रधानपदावर असलेले मनमोहन सिंग यांचा पत्ताच नाही. गेली दहा वर्षं ज्यांनी या देशाला सांभाळलं ते सिंग आज किंग राहिले नाहीत.

गोव्यात ७८ टक्के मतदान, त्रिपुरा, आसाममध्येही चांगले

गोव्यात ७८ टक्के मतदान, त्रिपुरा, आसाममध्येही चांगले

Last Updated: Saturday, April 12, 2014, 19:13

गोव्यात उत्साहात मतदान झाले. सरासरी ७८ टक्के मतदान झाले आहे. दक्षिण गोव्यात 75 टक्केपेक्षा जास्त तर उत्तर गोव्यात 76 टक्केंपेक्षा जास्त मतदान झाले. तर त्रिपुरात 81 टक्के मतदान झाले. तर आसाममध्ये 75 टक्केच्या जवळपास मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे.