गाझियाबादमध्ये बेहिशेबी साडेसहा कोटी रूपये जप्त

गाझियाबादमध्ये बेहिशेबी साडेसहा कोटी रूपये जप्त

Last Updated: Thursday, March 20, 2014, 20:02

गाझियाबाद शहरात सुमारे साडेसहा कोटी रुपयांची बेहिशेबी कॅश ४ वेगवेगळ्या ठिकाणी जप्त करण्यात आली.

अलाहाबादमध्ये भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या

Last Updated: Thursday, March 20, 2014, 18:46

उत्तर प्रदेशमधील अलाहाबादमध्ये भारतीय जनता पक्षाच्या युवा नेत्याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. हत्या झाल्यानंतर संपूर्ण अलाहाबादमध्ये तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे.

पत्रकार-लेखक खुशवंत सिंह यांचं निधन

Last Updated: Thursday, March 20, 2014, 16:06

ज्येष्ठ लेखक,पत्रकार आणि स्तंभलेखक खुशवंत सिंग यांच आज नवी दिल्लीत राहत्या घरी निधन झालं. इंग्रजीतले एक वाचकप्रिय लेखक म्हणून त्यांची ओळख होती.

अनौरस मुलाच्या संगोपनासाठी पोटगी देणं बंधनकारक

Last Updated: Thursday, March 20, 2014, 17:21

दिल्ली कोर्टानं नुकताच एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. आता पित्याला स्वत:च्या अनौरस अपत्याची जबाबदारी टाळता येणार नाहीय. मुलाच्या संगोपनासाठी त्यानं महिलेला पोटगी देणं अनिवार्य असणार आहे. दिल्ली कोर्टानं हा निर्णय दिलाय.

लालकृष्ण अडवाणी रुसलेत अन्...

लालकृष्ण अडवाणी रुसलेत अन्...

Last Updated: Thursday, March 20, 2014, 14:18

भाजपमध्ये नरेंद्र मोदी फिवर असताना दिल्लीत मात्र, अस्वथ आहे. दिल्लीतील लालकृष्ण अडवाणी यांच्या घराचे उंबरठे भाजपचे वरिष्ठ नेते झिजवत असल्याचे दिसून आले आहे. अडवाणी ज्या ठिकाणांहून आतापर्यंत निवडून येत आहेत तेथून निवडणूक लढण्यास त्यांनी चक्क नकार दिलाय. परंतु भाजप त्याच जागेवर अडून बसले आहे. त्यामुळे अडवाणी रुसून बसलेत. त्याचा रुसवा काढण्यासाठी नेत्यांची पळापळ सुरू आहे.

आमिर बनला निवडणूक आयोगाचा `नॅशनल आयकॉन`

Last Updated: Thursday, March 20, 2014, 10:28

निवडणूक आयोगानं बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला नॅशनल आयकॉन म्हणून निवडलंय. आमिर भारतीय निवडणूक आयोगाच्या एका जाहिरातीत काम करताना दिसणार आहे.

विमानात केला डांस, स्पाइसजेटला डीजीसीएची नोटीस

विमानात केला डांस, स्पाइसजेटला डीजीसीएची नोटीस

Last Updated: Thursday, March 20, 2014, 10:06

होळीच्या दिवशी आणि तेही विमान उडतांना विमानात केलेला डांस स्पाइसजेटला चांगलाच महागात पडलाय. गोवा ते बंगळुरू जाणाऱ्या फ्लाईटचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर नागरी विमानन नियमननं (डीजीसीए) स्पाइसजेट एअरलाईन्सला कारणे दाखवा नोटीस बजावलीय.

महिला मंत्र्यांवर प्रचार सभेत दगडफेक

महिला मंत्र्यांवर प्रचार सभेत दगडफेक

Last Updated: Thursday, March 20, 2014, 12:32

हरियाणाच्या आरोग्यमंत्री किरण चौधरी यांच्यावर नारनौल येथील प्रचार सभेत दडगफेक करण्यात आली. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्यात. त्यांना तात्काळ गुरवागमधील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नाराज अडवाणींची समजूत काढण्यासाठी मोदी दिल्लीत!

नाराज अडवाणींची समजूत काढण्यासाठी मोदी दिल्लीत!

Last Updated: Thursday, March 20, 2014, 09:24

भोपाळहून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असलेले लालकृष्ण अडवाणी गांधीनगरचं तिकीट मिळाल्यानं नाराज आहेत. त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि सुषमा स्वराज अडवाणींच्या निवासस्थानी पोहोचलेत. अडवाणींच्या निवासस्थानी जाण्यापूर्वी मोदींनी पक्ष मुख्यालयातही भेट दिली.

स्वत:च्या मुलीवर ३ वर्षापासून बलात्कार

स्वत:च्या मुलीवर ३ वर्षापासून बलात्कार

Last Updated: Wednesday, March 19, 2014, 20:24

आपल्या 21 वर्षीय मुलीवर सतत तीन वर्षे बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला राजस्थान पोलिसांनी अटक केली.