खासदारांच्या कार्यालयाजवळील दारू अड्डा उद्ध्वस्थ

खासदारांच्या कार्यालयाजवळील दारू अड्डा उद्ध्वस्थ

Last Updated: Monday, October 28, 2013, 14:32

औरंगाबादमध्ये मछली खडक भागात संतप्त नागरिकांनी दारु अड्डा उद्ध्वस्थ केलाय. गेल्या अनेक वर्षांपासून मछली खडक भागात हे देशी दारूचं दुकान सुरूय. त्यामुळं दारुडे दारू पिऊन धिंगाणा घालतात त्याचप्रमाणं दारू पिऊन येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांची छेड दारुडे काढतात.

पैठणमध्ये संस्थाचालकाचं विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य

पैठणमध्ये संस्थाचालकाचं विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य

Last Updated: Tuesday, October 22, 2013, 11:01

पैठणमध्ये वारकरी पंथाचे शिक्षण घेणाऱ्या तेरा वर्षीय मुलासोबत त्याच वारकरी संस्था चालकानं अनैसर्गिक कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. नारायण रामभाऊ साळुंके असं या संस्थाचालकाचं नाव असून त्याला अटक करण्यात आलीय.

दीड वर्षांनंतर उलगडलं योगेश्वरी मंदीरातील चोरीचं रहस्य

दीड वर्षांनंतर उलगडलं योगेश्वरी मंदीरातील चोरीचं रहस्य

Last Updated: Monday, October 21, 2013, 21:53

तब्बल दीड वर्षापूर्वी घडलेल्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिरातील दरोडा प्रकरणाचा उलगडा झाला असून पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला अटक केलीय.

सिंचन घोटाळा: भाजपनं दिले गाडीभर पुरावे!

सिंचन घोटाळा: भाजपनं दिले गाडीभर पुरावे!

Last Updated: Monday, October 21, 2013, 13:47

महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या चितळे समितीसमोर आज भाजपच्यावतीनं भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करण्यात आलेत. तब्बल १४ हजार पानांची कागदपत्रं आणि पुरावे सादर करण्यात आलीयत. बैलगाडीमधून ४ बॅग्ज भरून हे पुरावे सादर केलेत.

तावडे, फडणवीस आज देणार सिंचन घोटाळ्याचे पुरावे

Last Updated: Monday, October 21, 2013, 10:41

महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या चितळे समितीसमोर आज भाजपच्यावतीनं भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करण्यात येणार आहेत.

जामा मशिदीची रेकीचा संशय, चौकशी पथक आंध्र प्रदेशात

Last Updated: Saturday, October 19, 2013, 11:42

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहरात जामा मशिदीची रेकी झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. परभणी पोलीस आणि राज्य एटीएस पथकानंही याची दखल घेतली असून सोलापूर आणि आंध्र प्रदेशमध्येही चौकशीचं एक पथक रवाना झालंय. काय आहे. काय आहे हा सारा प्रकार. एक रिपोर्ट.

फरार राष्ट्रवादीचा नगरसेवक पोलीस अधिकाऱ्यांच्या शेजारीच

फरार राष्ट्रवादीचा नगरसेवक पोलीस अधिकाऱ्यांच्या शेजारीच

Last Updated: Saturday, October 19, 2013, 10:50

जालन्याच्या टोल नाक्यावर तलवार घेऊन धिंगाणा घालणारा राष्ट्रवादीचा नगरसेवक नूर खान सध्या पोलीस दप्तरी फरार आहे. मात्र, हा नगरसेवक पोलीस अधिकाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून उभा असल्याचे फोटोत कैद झालं आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

मराठवाड्यासाठी खूशखबर... जायकवाडीचा पाणीसाठा वाढला!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 18:01

दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील जनतेसाठी एक चांगली बातमी आहे. जायकवाडीचा पाणीसाठा सध्या ३२.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजे आज संध्याकाळपर्यंत हा पाणीसाठा ३३ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

तुळजाभवानी मंदिरात सुरक्षेचा बोजवारा

तुळजाभवानी मंदिरात सुरक्षेचा बोजवारा

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 18:06

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणा-या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील प्रशासन पूर्णपणे कोलमडले आहे. भाविक आणि मंदिराच्या सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

अवघ्या एका महिन्याच्या चिमुरडीला जिवंत जाळलं!

अवघ्या एका महिन्याच्या चिमुरडीला जिवंत जाळलं!

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 13:09

अवघ्या एका महिन्याच्या तान्हुलीस जिवंत जाळल्याची घटना औरंगाबादजवळच्या वाळूज भागातल्या शिवराई परिसरात घडलीय.