अखेर... पुणे स्फोटाचा `मास्टरमाईंड` जाळ्यात

Last Updated: Friday, December 28, 2012, 19:28

औरंगाबादहून पकडण्यात आलेला काशीद बियाबानी जफर बियाबानी हाच पुणे बॉम्सस्फोटाचा मास्टरमाईंड असल्याचं एटीएसच्या तपासात पुढं आलं आहे.

ACP कडून महिला कॉन्स्टेबलचा छळ

Last Updated: Thursday, December 27, 2012, 22:36

औरंगाबादचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. संदिप भाजीभाकरे यांच्यावर महिला कॉन्स्टेबलनं लैंगिक छळाचा आरोप केलाय. भाजीभाकरेंविरोधात शहरातील सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

शिवसेना- एमआयएम नगरसेवकांची पालिकेत हाणामारी

Last Updated: Monday, December 24, 2012, 18:35

नांदेड महापालिकेत शिवसेना आणि एमआयएमच्या नगरसेवकांत प्रचंड गोँधळ झाला. उर्दू शाळा सुरु करण्याच्या कारणावरुन दोन्ही पक्षांचे नगरसेवक आंमनेसामने आले.

औरंगाबादमध्ये घरफोड्या

Last Updated: Monday, December 24, 2012, 18:13

औरंगाबादेत सध्या पोलिसांचं राज्य आहे की चोरट्यांचं असा प्रश्न उभा राहिलाय. कारण गेल्या तीन दिवसांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी दिवसाढवळ्या घरफोड्या झाल्या आहेत.

शिक्षणासाठी बनवलं गुलाबी रंगाचं खेडं

Last Updated: Wednesday, December 19, 2012, 17:19

शिक्षणाच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी एका शिक्षक अवलियाने शिक्षणासाठी स्वखर्चाने गुलाबी रंगाचं खेडं बनवलं. ही वास्तवातील घटना आहे, जालना जिल्ह्यातील एका गणेशपूर खेड्यातील.

`हज हाऊस`साठी `रिपाइं` मैदानात

Last Updated: Tuesday, December 18, 2012, 22:06

औरंगाबादेत आज हज हाऊसच्या प्रश्नाने आक्रमक वळण घेतलं. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत मुस्लिम संघटनाचं ‘हज हाऊस’साठी आंदोलन सुरु आहे. त्यात आता आरपीआयने उडी घेतली आहे.

सुरेश जैन यांचा जामीन अर्ज फेटाळला

Last Updated: Monday, December 17, 2012, 18:10

जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळलाय. या घोटाळ्यातील 53 आरोपींविरोधात दोषारोप निश्चित करा असे निर्देशही जळगाव कोर्टाला देण्यात आलेत.

अफजल गुरूला फाशी देऊ नका - आंबेडकर

Last Updated: Sunday, December 16, 2012, 12:06

अफजल गुरूला फाशी देण्यास भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केलाय. अफझलला फाशी दिल्यास काश्मीरमधल्या दहशतवाद्यांसाठी तो हुतात्मा ठरेल, त्यापेक्षा जेलमध्ये ठेवणंच चांगलं असं आंबेडकर यांनी म्हटलंय.

पारधी समाजाच्या वस्तीवर अज्ञात लोकांचा हल्ला

Last Updated: Monday, December 10, 2012, 22:20

गायरान जमिनीच्या वादातून औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिंधी सिरजगाव इथं पारधी समाजाच्या वस्तीवर अज्ञात लोकांच्या जमावाने सशस्त्र हल्ला चढवून 15 ते 20 झोपड्या जाळल्या. या घटनेत सातजण जखमी झाले. गायरान जमिनीचा वाद न्यायालयात सुरू असून या वादातून हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येतंय.

सैन्य भरतीची प्रक्रिया सुरू; प्रशासन सतर्क

Last Updated: Friday, December 7, 2012, 16:23

जळगावनंतर आता सैन्य भरतीची प्रकिया औरंगाबादमध्ये पार पडणार आहे. जळगावमध्ये गेल्या ३० नोव्हेंबरपासून ६ डिसेंबरपर्यंत सैन्य भरती सुरू होती.