Last Updated: Tuesday, May 20, 2014, 14:06
दिवा पॅसेंजर गाडीत बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने रोहा-दिवा गाडी रोहा येथे थांबविण्यात आली. बॉम्बच्या अफवेने सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली. तर रोहा येथे गाडी थांबवून ठेवण्यात अाल्याने भीतीचे वातावरण होते. दरम्यान, अलिबागहून बॉम्बशोधक पथक रोहा येथे दाखल झाल्यानंतर शोध घेतल्यानंतर बॉम्बची अफवा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अडीच तासानंतर गाडी सोडण्यात आली.