अमेठी सांभाळू शकत नाही, देश कसा सांभाळणार- मोदी

अमेठी सांभाळू शकत नाही, देश कसा सांभाळणार- मोदी

Last Updated: Monday, April 21, 2014, 11:17

जळगावमध्ये झालेल्या सभेत नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर निशाणा साधलाय. जे अमेठी सांभाळू शकले नाहीत, ते देश काय सांभाळणार? असा सवाल करत देशातून मां-बेट्याला हद्दपार करा, असं आवाहन त्यांनी केलंय.

मुंडे पुन्हा रुसले, पण यावेळी रिक्षात बसले!

मुंडे पुन्हा रुसले, पण यावेळी रिक्षात बसले!

Last Updated: Sunday, April 20, 2014, 16:13

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरात मुक्कामी असलेले भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना विमानतळाकडे घेऊन जाण्यासाठी नियोजित वेळी वाहन न आल्यानं मुंडे यांचा पारा चांगलाच चढला. संतापाच्या भरात ते हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या रिक्षात बसून थेट विमानतळाकडे रवाना झाले.

पेपरमध्ये जाहिरात देऊन इंजिनिअरनं मोडलं लग्न

Last Updated: Saturday, April 19, 2014, 10:45

सभ्य आणि सुशिक्षित समाजाला काळिमा फासणारी घटना चंद्रपुरात घडलीय. उच्च विद्याविभूषित तरुणीचं लग्न हुंड्याच्या मागणीमुळे मोडलंय. पोलिसांनी नियोजित नवरदेवासह चौघांना गजाआड केलंय.

जनावरांच्या सोनोग्राफी मशिनमधून गर्भलिंग निदानाचा धोका!

जनावरांच्या सोनोग्राफी मशिनमधून गर्भलिंग निदानाचा धोका!

Last Updated: Monday, April 14, 2014, 15:26

जनावरांच्या आजारावर उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये असलेल्या सोनोग्राफी मशीनमधून महिलेच्या गर्भातील मुलगा-मुलगी निदान करणं शक्य असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळं पशुवैद्यकीय रुग्णालयांमधील सोनोग्राफी मशीनवर पीसीपीएनडीटी पथकाकडून वॉच ठेवण्यात येतोय. सोबतच पशुवैद्यकीय रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्र गर्भधारणापूर्व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यानुसार नोंदणीकृत करण्यात आले आहेत.

राज्यात पहिल्या टप्प्यात ६२.३६ टक्के मतदान

राज्यात पहिल्या टप्प्यात ६२.३६ टक्के मतदान

Last Updated: Thursday, April 10, 2014, 22:48

विदर्भात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळालाय. सरासरी सुमारे ५५.७० टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, सायंकाळी गर्दी वाढल्याने काही ठिकाणी ६.३० वाजेपर्यंत मतदान सुरु होते. राज्यात पहिल्या टप्प्यात ६२.३६ टक्के मतदान झाले. या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी नक्षल्यांचे हल्लेही परतविलेत. काही ठिकाणी नावे नसल्याने गोंधळ दिसून आला.

अबब! 46 हजार मतदारांची नावं मतदान यादीतून गायब

अबब! 46 हजार मतदारांची नावं मतदान यादीतून गायब

Last Updated: Thursday, April 10, 2014, 19:33

अमरावती लोकसभा मतदारसंघातील एका परिसरातील सुमारे 46 हजार लोकांची नावं मतदार यादीतून गायब असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार अभिजित अडसूळ यांनी केला आहे. त्यामुळं अमरावती तहसील कार्यालयात गोंधळाची स्थिती आहे. एकाच भागातील समुारे 46 हजार मतदारांची नावं अचानक गायब होणं यामागे काही तरी राजकीय षडयंत्र आहे का याची चर्चा सुरु झाली आहे.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा निवडणूक कर्मचाऱ्यांवर गोळीबार

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा निवडणूक कर्मचाऱ्यांवर गोळीबार

Last Updated: Thursday, April 10, 2014, 16:29

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर गोळीबार केला आहे.

आधी बोटावर शाई; मग, लगीनघाई!

Last Updated: Thursday, April 10, 2014, 14:21

नागपूरमध्ये मतदार किती जागरुक आहेत त्याचं उदाहरण आज पाहायला मिळालं. बोहल्यावर चढलेली वधू आपलं लग्न मागे ठेऊन पहिल्यांदा मतदान केंद्रावर जाऊन उभी राहिली.

कमी उंचीच्या महिलेचं मतदानात मोठं योगदान

Last Updated: Thursday, April 10, 2014, 15:28

नागपूराची ज्योती आमगे या जगातील सर्वांत कमी उंचीच्या मुलीने आज प्रथमच मतदानाचा हक्क बजावलाय.

पाहा विदर्भात कोण आमने-सामने

पाहा विदर्भात कोण आमने-सामने

Last Updated: Thursday, April 10, 2014, 11:10

विदर्भात आज दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी, आपच्या नेत्या अंजली दमानिया तसेच काँग्रेसचे विलास मुत्तेमवार आमने-सामने आहेत.