विदर्भात मतदानाला उत्तम प्रतिसाद

विदर्भात मतदानाला उत्तम प्रतिसाद

Last Updated: Friday, April 11, 2014, 09:29

देशातील सर्व नक्षलग्रस्त भागात आज मतदान होत आहे. म्हणून आजच्या मतदानाकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

मतदानापूर्वीचा विदर्भ: पैशांची लूट आणि दारूचा पूर

मतदानापूर्वीचा विदर्भ: पैशांची लूट आणि दारूचा पूर

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 20:26

निवडणुकांमध्ये चालणारे काळे व्यवहार हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. काळ्या पैशांच्या वापरापासून ते अवैधरित्या दारूचा पुरवठ्यापर्यंत किंवा वस्तुंच्या बदल्यात आपलं बहुमूल्य मत विकत घेण्यापर्यंत अनेक प्रकार घडत असतात... हा प्रकार थांबवायचा असेल, तर आपल्यालाच संयम बाळगणं आणि सावध राहणं आवश्यक आहे.

नागपूर, विदर्भात दहा जागांसाठी 201 उमेदवार रिंगणात

नागपूर, विदर्भात दहा जागांसाठी 201 उमेदवार रिंगणात

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 20:02

निवडणुकीसाठी संपूर्ण विदर्भ सज्ज झालाय. 10 लोकसभा मतदारसंघात एकूण 201 उमेदवार आपलं भवितव्य आजमावणार आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 33 तर अकोला मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे सात उमेदवार आहेत. मतदानाच्या निमित्ताने सर्वच मतदारसंघात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

विदर्भातील निवडणूक प्रचार थंडावलाय

विदर्भातील निवडणूक प्रचार थंडावलाय

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 08:28

लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातल्या प्रचारातल्या तोफा थंडावल्या आहेत. तिस-या टप्प्यातलं मतदान 10 तारखेला होणार आहे. तिस-या टप्प्यात देशभरातल्या 92 मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात विदर्भातल्या 10 जागांचाही समावेश आहे.

`मरा पण नेत्यांना मारुन मरा`, राज ठाकरेंचं वादग्रस्त विधान

`मरा पण नेत्यांना मारुन मरा`, राज ठाकरेंचं वादग्रस्त विधान

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 10:47

वीज, पाणी तसंच दळवळणाच्या सुविधा नसल्यानंच विदर्भातला शेतकरी देशोधडीला लागलाय, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. आत्महत्या हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं उत्तर नसून `मरा पण नेत्यांना मारुन मरा`, असं वादग्रस्त विधानही त्यांनी यावेळी केलं. ते यवतमाळमध्ये मनसे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

<B> व्हिडिओ :</b> पोलिसाकडून वृद्ध महिलेला मारहाण!

व्हिडिओ : पोलिसाकडून वृद्ध महिलेला मारहाण!

Last Updated: Saturday, April 5, 2014, 20:16

पोलिसांच्या दबंगगिरीचे अनेक किस्से आपल्याला पाहायला, वाचायला मिळतात... पण, हीच दबंगगिरी आता व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर उघड व्हायला वेळ लागत नाही... याचाच प्रत्यय नागपूरमध्ये आलाय.

पराभव समोर दिसत असल्यानं पवारांचा तोल सुटला- गडकरी

पराभव समोर दिसत असल्यानं पवारांचा तोल सुटला- गडकरी

Last Updated: Monday, March 31, 2014, 12:55

शरद पवारांनी काल जाहीर सभेमध्ये मोदींना ट्रीटमेंटची गरज असल्याच्या केलेल्या वक्तव्यावर आज भाजप नेते नितीन गडकरींनी टीका केलीय. मोदींवर पवारांनी केलेलं वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण आहे. पवारांना पराभव समोर दिसत असल्यानं त्यांचा तोल सुटल्याचं गडकरींनी म्हटलंय.

बाळासाहेबांचं कार्य पुढं चालू ठेवा, मोदींचं आवाहन

बाळासाहेबांचं कार्य पुढं चालू ठेवा, मोदींचं आवाहन

Last Updated: Sunday, March 30, 2014, 13:36

अमरावतीमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडली. आनंदराव अडसूळांच्या प्रचारासाठी मोदी आज अमरावतीमध्ये दाखल झाले होते. यावेळी शेतकरी आत्महत्यांवरून मोदींनी राज्यसरकार आणि शरद पवारांना चांगलच धारेवर धरलं.

अमरातीमध्ये कपडा दुकानाला आग, ७ जणांचा मृत्यू

अमरातीमध्ये कपडा दुकानाला आग, ७ जणांचा मृत्यू

Last Updated: Sunday, March 30, 2014, 16:04

अमरावतीमध्ये एका कपड्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत कोतवाल कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. अमरावतीतील परतवाडा रोड इथल्या टिळकचौकातील ही घटना आहे.

युवतीची एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

युवतीची एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

Last Updated: Saturday, March 29, 2014, 20:19

खामगावमध्ये एकतर्फी प्रेमातून होणार्‍या सततच्या त्रासाला कंटाळून एका युवतीने आत्महत्या केली आहे.