कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाचे छापे

कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाचे छापे

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 23:49

एका महिन्यात जमिनीवर असलेले कांद्याचे दर आकाशाला भिडविना-या व्यापा-यांवर आयकर विभागानं आज धाडी टाकल्या. आयकर विभागाच्या अंदाजे पंधरा ते वीस अधिका-यांनी लासलगावात ओमप्रकाश रतनलाल राका व ब्रम्हेचा फर्म या कांदा व्यापा-यांकडे दिवसभर कसून चौकशी केली.

ग्रामीण भागातही ‘ऑनलाईन शॉपिंग’ची क्रेझ!

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 15:52

राज्यात सध्या ग्रामीण महाराष्ट्रात ऑनलाईन शॉपिगची क्रेझ वाढतेय. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका यात अग्रेसर असून जळगाव जिल्ह्यातही क्रेझ वाढताना दिसून आलीय.

ऑफिस रॅगिंगला कंटाळून तरुणीची आत्महत्या

ऑफिस रॅगिंगला कंटाळून तरुणीची आत्महत्या

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 12:15

नाशिकच्या सातपूरमध्ये बॉश कंपनीत प्रशिक्षणार्थी असणाऱ्या एका मुलीनं ऑफिसमधल्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केलेल्या मुलीचा मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतलंय.

सुरेश जैन यांच्या पतंगानं घेतली भरारी!

Last Updated: Monday, September 2, 2013, 14:38

घरकुळ घोटाळ्यासंदर्भात कारागृहात असलेले सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीनं सर्वाधिक ३३ जागांवर विजय मिळवत जळगाव महापालिका निवडणुकीत सरशी मिळवलीय. सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा ३६ असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

शाळेने वाटल्या विद्यार्थिनींना गर्भवती महिलांच्या गोळ्या!

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 19:08

धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात किशोवयीन मुलींना लोहयुक्त गोळ्यांऐवजी गरोदर मातांसाठी असलेल्या गोळ्यांच वाटप करण्यात आलं.

भाव गडगडले तरीही कांदा महागच

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 09:08

दर वाढीचे नवनवीन विक्रम प्रस्थापित करणार्या् कांद्याचे भाव अचानक गडगडल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. ५ हजारावरून आता ३८०० रुपयांत कांदा पोहचलाय. त्यामुळे शेतकरी नाराज झालाय.

आ. अनिल कदमांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल, जामीन मंजुर

Last Updated: Monday, August 26, 2013, 16:28

कायदा करणारे आमदारच आता कायदा हाती घेऊ लागले आहेत. मारहाण करणे, धमकावणे, शिवीगाळ, विनयभंग अशी राडेबाजी लोकप्रतिनिधी म्हणवणा-या आमदारांनीच सुरू केलीय. दुर्दैवाची बाब म्हणजे सर्वच पक्षांच्या आमदारांचा त्यात समावेश आहे.

उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका!

Last Updated: Sunday, August 25, 2013, 20:05

नाशिकवरचा उतरलेला भगवा पुन्हा फडकवा अस भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी बुथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केलं.

'असभ्य' आमदाराला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा!

Last Updated: Sunday, August 25, 2013, 18:54

टोलनाक्यावर महिलांना अर्वाच्य शिविगाळ करणा-या आमदार अनिल कदम यांना उद्धव ठाकरे यांनी पाठिशी घातलंय. शिवसेनेच्या संस्कृतीचा दाखला देत त्यांनी अनिल कदम यांची तळी उचलून धरली आहे.

शिवसेनेच्या `प्रतापी` आमदारांचा अखेर राजीनामा!

Last Updated: Saturday, August 24, 2013, 21:13

टोलनाक्यावर महिलांना शिवीगाळ केल्यामुळे वादात अडकलेल्या आमदार अनिल कदम यांनी राजीनामा दिलाय. पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर कदम यांनी महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली होती.