शिवसेना आमदाराची महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ

Last Updated: Thursday, August 22, 2013, 20:19

आमदार कदम यांना टोलची पावती फाडण्यास सांगितल्याचा राग आला आणि त्यांनी महिला कर्मचाऱ्य़ांना आई-बहिणींवरून शिव्या देत थेट कपडे उतरवण्याची धमकी दिली. आपल्या सांगण्यावरून जर गाडी सोडली नाही, तर कर्मचारी महिलांना कपडे उतरवायला लावेन अशा गलिच्छ शब्दांत महिलांना धमकी दिली.

पिंपळगावात गावकऱ्यांच्या पुढाकाराने ५४ सीसीटीव्ही!

Last Updated: Wednesday, August 21, 2013, 19:55

देशातील सर्वात मोठे कांदा खरेदी विक्रीचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील पिपळगावात तब्बल ५४ सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ग्रामपालिका असलेल्या या गावाने पुढाकार घेत कायदा व सुव्यवस्था चोख केली आहे.

कॉलेज विद्यार्थिनीची नाशिक मनपाला सणसणीत चपराक!

Last Updated: Wednesday, August 21, 2013, 18:11

एकीकडे नाशिकमधल्या खड्ड्यांवरुन सत्ताधा-यांवर प्रचंड टीका होतेय. तरीही खड्डे नीट बुजवले जात नाहीत. त्याचवेळी नाशिकमधल्या कॉलेजच्या विद्यार्थिनीनं पॉकेटमनीमधून कॉलेजजवळचे खड्डे बुजवलेत.

नाशिक मनपाचा `लाखमोला`चा नाश्ता

Last Updated: Monday, August 19, 2013, 23:14

नाशिक महानगर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं कारण पुढे करत शहरात विकासकाम ठप्प आहेत. ठेकेदारांची मागचीच बिल थकली असल्यानं नवीनं कामांना पैसा आणणार कुठून असा सवाल प्रशासन उपस्थित करत असतानाच चहापाणी, हारतुरे आणि नास्त्यावर लाखो रुपयांची उधळण होत असल्याचं समोर आलाय

वसतीगृहात विद्यार्थिनीचा मृत्यू!

Last Updated: Sunday, August 18, 2013, 22:16

आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांमध्ये विषबाधेने विद्यार्थ्याचा बळी जाण्याचे प्रकार याआधी घडले होते. आता असाच प्रकार समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळेतही घडलाय. नाशिक जिल्ह्याच्या सुरगाण्याच्या एका वसतीगृहातल्या पाचवीतल्या मुलीचा बळी गेलाय.

खड्ड्यावरून मनसेचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Last Updated: Saturday, August 17, 2013, 18:30

नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण पुन्हा एकदा झोकात सुरु झालंय. कालपर्यंत खड्डे बुजत नाहीत म्हणून बोटं मोडणारी मनसे आता खड्डे बुजविले जातायेत म्हणून आपल्याच अधिका-यांविरोधात शंका उपस्थित करतेय.

अजितदादांची राज ठाकरेंवर तोफ

Last Updated: Friday, August 16, 2013, 23:22

नाशिकमधील खड्ड्यांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सणसणीत टोला लगावलेला.

राज ठाकरेंचा हातोडा, पण आयुक्तांचे पेव्हरलाच फेवर

Last Updated: Friday, August 16, 2013, 20:37

खड्डे पेव्हरब्लॉकनं कसले बुजवता, असं म्हणत राज ठाकरेंनी मुंबईत परवाच म्हंटलं.... त्यांच्या या विधानाला दोन दिवसही उलटले नाहीत..... तोच खड्डे बुजवण्यासाठी पेव्हरब्लॉकच उत्तम, असं सर्टिफिकीट दिलंय मनसेचीच सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेच्या आयुक्तांनी..

कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा!

Last Updated: Friday, August 16, 2013, 19:56

कांद्याने सध्या सगळ्यांचाच वांदा केलाय... कांद्याच्या किंमती भडकल्यानं ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आलंय... मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळं कांद्याची भाववाढ झाल्याचं तर्कशास्त्र कृषीमंत्री शरद पवार मांडतायत...

साईभक्तांसाठी आजपासून मोफत लाडूचा प्रसाद

Last Updated: Thursday, August 15, 2013, 14:52

साईभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिर्डीत साईभक्तांसाठी आजपासून मोफत बुंदी लाडूच्या प्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे. गुरुवार आणि स्वातंत्र्यदिनाचा आजचा मुहूर्त साधून दर्शन रांगेतच प्रसादाचं वाटप सुरू करण्यात आलं.