बनावट कागदपत्रांच्या आधारावर ३३ हेक्टर जमीन लाटली!

बनावट कागदपत्रांच्या आधारावर ३३ हेक्टर जमीन लाटली!

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 21:21

बनावट कागदपत्रांच्या आधारे वेगवेगळ्या कंपन्यांच्या मालकीची ३३ हेक्टर जमीन स्वत:च्या कंपनीच्या नावावर करून घेतल्याप्रकरणी प्रतीककुमार प्रफुलकुमार शहा या पुण्यातल्या व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केलीय.

राज्य सरकारनेच केली पुणे मनपाच्या गैरव्यवहारांची पोलखोल

राज्य सरकारनेच केली पुणे मनपाच्या गैरव्यवहारांची पोलखोल

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 20:09

पुणे महापालिकेतले अनेक गैरव्यवहार आजवर उघड झाले आहेत… कधी एनजीओंनी, कधी आरटीआय कार्यकर्त्यांनी तर कधी, माध्यमांनी हे गैरव्यवहार उघडकीस आणलेत… आता मात्र राज्य सरकारनंच पुणे महापालिकेतला एक गैरव्यवहार चव्हाट्यावर आणलाय.

पुणे येरवडा मनोरुग्णालयात तरुणीवर लैंगिक अत्याचार

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 08:06

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका मनोरुग्ण तरुणीवर पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयात लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना मागील आठवड्यात समोर आली होती. त्या प्रकरणी उस्मानाबाद मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो गुन्हा येरवडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

कोल्हापुरात पोलिसांची ग्रँड मस्ती, मद्यधुंदावस्थेत गस्त!

कोल्हापुरात पोलिसांची ग्रँड मस्ती, मद्यधुंदावस्थेत गस्त!

Last Updated: Monday, October 7, 2013, 11:23

मद्यधुंद अवस्थेत असताना गस्त घालण्यासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या व्हॅनला रात्री कोल्हापुरात अपघात झालाय. या अपघातात पोलीस व्हॅन वीजेच्या खांबावर जावून आदळली. त्यामुळं संतप्त जमावानं वाहनचालक चंद्रकांत कामत यांच्यासह पोलीस गाडीत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना चांगला चोप देत पोलीस व्हॅनवर हल्ला चढवला.

उर्से टोलजवळ विचित्र अपघात, १२ जखमी

Last Updated: Monday, October 7, 2013, 10:57

मुंबई एक्स्प्रेस-वेवर उर्से टोलनाक्याजवळ रविवारी सायंकाळी चार भरधाव गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झालाय. अपघातातील चौघे अत्यवस्थ असून, ८ जण जखमी झालेत.

महावितरण घोटाळ्याला अजितदादांचं संरक्षण, भाजपचा आरोप

महावितरण घोटाळ्याला अजितदादांचं संरक्षण, भाजपचा आरोप

Last Updated: Sunday, October 6, 2013, 20:07

महावितरण आणि महाजनकोने ६० हजार कोटींचा घोटाळा असून, या घोटाळ्याला उर्जामंत्री अजित पवार यांचं संरक्षण आहे, असा गंभीर आरोप भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला. सांगलीत भंडारी हे प्रसारमाध्यामांशी बोलत होते.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारपासून रिक्षांची भाडेवाढ

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारपासून रिक्षांची भाडेवाढ

Last Updated: Sunday, October 6, 2013, 17:53

पुण्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १५ ऑक्टोबरपासून रिक्षांची भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महागाईने आधीच त्रस्त जनतेला महिन्याचे बजेट सांभाळतांना कसरत करावी लागणार आहे.

कोल्हापूरच्या राधानगरीत `कास`चा आभास

कोल्हापूरच्या राधानगरीत `कास`चा आभास

Last Updated: Sunday, October 6, 2013, 07:39

कोल्हापूरच्या राधानगरी अभायारण्यात आणखी एक नैसर्गिक कासपठार अवतरलंय...

पाच फुटी अजगराने गिळला कुत्रा

पाच फुटी अजगराने गिळला कुत्रा

Last Updated: Saturday, October 5, 2013, 15:00

तब्बल साडे पाच फूट लांब आणि वजनाने आठ किलो असलेल्या एका अजगराला चाकणच्या वसुंधरा बहु उद्देशीय संस्थेच्या सर्प मित्रांनी पकडून गावातल्यांना भयमुक्त केलं आहे.

कधी होणार पुण्यातील धोकादायक वाडे रिकामे?

कधी होणार पुण्यातील धोकादायक वाडे रिकामे?

Last Updated: Thursday, October 3, 2013, 20:54

पुण्यातही धोकादायक इमारतींमध्ये हजारो लोक राहत असल्याची माहिती पुढे आलीय. विशेष म्हणजे यात महापालिकेच्या वसाहातींचीच संख्या जास्त आहे. महापालिका स्वतःच्याच वसाहतींकडे दुर्लक्ष करत असेल तर, सामान्य पुणेकरांनी महापालिकेकडून काय अपेक्षा ठेवायच्या, असा प्रश्न पुणेकर विचारतायत.