मतांसाठी पैसे... पैशांसाठी मतदान?

Last Updated: Sunday, July 7, 2013, 09:09

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची एकमेकांवरील चिखलफेक आणि मतांसाठी पैसे वाटपाचं फुटलेलं बिंग या पार्श्वभूमीवर सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेसाठी आज मतदान होतंय.

... तर आपली मांडी कापून द्यावी लागेल - अजित पवार

Last Updated: Saturday, July 6, 2013, 12:14

गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून बसण्यापेक्षा मांडी कापून फेकून देईन, असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधान केलेय. पण खरेतर दर बुधवारी कॅबिनेट बैठकीनंतर आर. आर. पाटील यांना आपली मांडी कापावी लागेल, असा टोला उद्योगमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

राज्यात अलिबाबा आणि ४० चोरांचे राज्य – मुंडे

Last Updated: Friday, July 5, 2013, 17:14

राज्यात अलिबाबा आणि त्यांच्या चाळीस चोरांचे राज्य आहे, यांना घरी घालवल्या शिवाय राहणार नाही, असा निर्धार भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी सांगलीच्या सभेत व्यक्त केला.

सोनियांवर टीका करणाऱ्यांवर राणे संतापले

Last Updated: Friday, July 5, 2013, 16:59

सांगली महापालिकेच्या निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय...या प्रचारसभेत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोनिया गांधींवर टीका करणा-यांचा खरपूस समाचार घेतला...

महाराज! तुमचा राजगड खचतोय!

Last Updated: Thursday, July 4, 2013, 21:27

शिवरायांनी स्थापन केलेल्या राज्याचा गड म्हणजे, किल्ले राजगड...मात्र या राजगडाचीही इतर किल्ल्यांप्रमाणे दुरवस्था झालीय. राजगडाच्या पाल दरवाज्याच्या बाजूचा रस्ता पावसामुळे खचलाय.

रिक्षावाल्यांचा पुणेरी रुबाब, आता देणार इंग्रजीत जवाब!

Last Updated: Thursday, July 4, 2013, 19:22

पुण्यातले रिक्षाचालक आता स्मार्ट बनू लागलेत. व्यवसायाची गरज म्हणून त्यांनी इंग्रजी शिकायला सुरुवात केलीय. त्यामुळे पुणेतल्या रिक्षा चालकांनी तुमचं इंग्रजीतून स्वागत केलं तर आश्चर्य वाटायला नको.

भास्कर जाधवांचा माणिकरावांवर प्रतिहल्ला

Last Updated: Thursday, July 4, 2013, 18:33

जयंत पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलाय. तर माणिकराव नैराश्यातून बोलत असल्याचा टोला जयंत पाटलांनी लगावलाय.

पुण्यात गोळीबार, एक ठार

Last Updated: Friday, July 5, 2013, 08:12

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे भरचौकात अर्जुन घुले यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे निधन झाले.

‘राष्ट्रवादीचे जयंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर’

Last Updated: Thursday, July 4, 2013, 15:05

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलाय.

मनसे-काँग्रेस टशन, विरोधी नेतेपद कोणाला?

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 18:36

पोटनिवडणूक... त्यातही महापालिकेची म्हटल्यावर तशी दुर्लक्षितच... पुण्यात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळतेय. महापालिकेच्या एका जागेची पोट निवडणूक कमालीची चुरशीची बनलीय.