Last Updated: Sunday, June 30, 2013, 13:05
मोक्षाचं प्रवेशद्वार असलेली नगरी अर्थात आळंदी नगरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी सज्ज झालीय. आज संध्याकाळी 4 वाजता पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होईल. आजचा माऊलींच्या पालखीचा मुक्काम गांधीवाड्यात असणार आहे. या सोहळ्यासाठी त्यासाठी आळंदी देवस्थान ट्रस्टची तयारी पूर्ण झालीय. यंदा पहिल्यांदाच पालखीचा रथ हायटेक बनवण्यात आलाय.