शिवसेनेची बिकट परिस्थिती, मुद्दे नसल्याने वडा, सूपवर - राणे

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 20:41

शिवसेनेची परिस्थिती बिकट आहे, त्यांच्याकडे मुददे नाहीत. म्हणून ते वडा आणि सूपवर आलेत, अशी टीका नारायण राणेंनी पुण्यात केलीय.

राजनाथ सिंहांनी धुडकावला राज ठाकरेंचा पाठिंबा!

राजनाथ सिंहांनी धुडकावला राज ठाकरेंचा पाठिंबा!

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 20:21

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी राज ठाकरेंच्या मनसेला उद्देशून चांगलाच टोला लगावलाय. `मी ऐकलंय की कुणीतरी नरेंद्र मोदींना पाठिंबा देतंय... पण मोदींना पाठिंबा द्यायचा असेल तर त्यांना महायुतीत सामील व्हावं लागेल.. किंवा त्यांना आपला पक्ष भाजपमध्ये विलिन करावा लागेल. त्याशिवाय केवळ पाठिंबा देण्याच्या भाषेला काहीच अर्थ नाही, असं राजनाथ सिंह यांनी पुण्यात बोलताना सांगितलं.

औरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा कोणता झेंडा घेऊ हाती?

औरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा कोणता झेंडा घेऊ हाती?

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 19:48

औरंगाबादमधील प्रचार आता शिगेला पोहचलाय. सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जोमात कामाला लागलेत. मात्र मनसे कार्यकर्ते मात्र या सगळ्यापासून दूर आहेत. अजूनही कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न या कार्यकर्त्यांना पडलाय.

निवडणुकीत अशी ही पुणेरी पाटी!

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 18:29

निवडणूकांच्या प्रचारात सोशल मीडियाचा वापर जरी वाढला असला, तरी पारंपारिक प्रचाराला अजूनही तितकंच महत्व आहे. त्यामुळे निवडणूकांच्या काळात फेलक्स बँनर आणि कटआऊटसना मोठी मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात असणारे फ्लेक्स व्यवसायिकही निःपक्षपातीपणे सर्वच पक्षांचं काम करताना दिसतायत.

बॅनरबाजी आणि घोषवाक्य... निवडणुकीचा फंडा!

बॅनरबाजी आणि घोषवाक्य... निवडणुकीचा फंडा!

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 18:06

ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि मनसेचे राजू पाटील यांच्यात रंगतदार लढत होतेय. त्यामुळंच एकमेंकावर कुरघोडी करत मतदारांचं लक्ष वेधण्यासाठी तिन्ही पक्षांनी घोषवाक्य तयार केलीत.

पद्मसिंह पाटलांच्या ताफ्याखाली चिरडून मुलीचा मृत्यू

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 18:09

लोकसभा निवडणुकीच्या आधीच एका निष्पाप आणि कोवळ्या जीवाला आपल्या प्राणास मुकावं लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांचा प्रचार सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडलीय.

मनसे लोकसभा निवडणुकीसाठी कोकणात `नोटा` वापरणार

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 16:47

लोकसभा निवडणुकीत रंगतदान लढतीमध्ये कोकणचा समावेश आहे. याठिकाणी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राणेंविरोधात काम करण्याची भूमिका घेतली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला उमेदवार दिलेला नाही. आपली मते कोणाच्या वाट्याला जाऊ नयेत म्हणून मनसे नकाधिकार म्हणजेच `नोटा` (यापैकी कोणीही नाही) याचा वापर करणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मतांचे विभाजन होणार नसल्याने काँग्रेसला याचा फटका बसू शकतो.

वारजे इथं अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

वारजे इथं अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 16:06

एका मागोमाग एक बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडतांना दिसतायेत. वारजे इथं पंधरा वर्षांच्या विद्यार्थिनीला जबरदस्तीनं मित्राच्या घरी नेऊन त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

अमोल कोल्हेंची राज ठाकरेंवर सणसणीत टीका

अमोल कोल्हेंची राज ठाकरेंवर सणसणीत टीका

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 15:13

निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना विरुद्ध मनसे यांचा वाद रंगतोय. या वादात आता शिवसेनेत नव्यानेच प्रवेश केलेल्या अभिनेता डॉ. अमोल कोल्हे याने उडी घेतली आहे.

मनसेच्या दीपक पायगुडेंना होतेय कलमाडी, बागवेंची मदत

मनसेच्या दीपक पायगुडेंना होतेय कलमाडी, बागवेंची मदत

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 13:10

निवडून दिल्यानंतर मी समाजासाठी काय केले हे सांगता आले पाहिजे, असं म्हणत मनसेचे पुण्याचे उमेदवार दीपक पायगुडे यांनी अनेक गौप्यस्फोट केलेत. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार “मला मदत केल्याशिवाय काँग्रेसच्या काहींना पर्याय नाही”, ही माहिती पायगुडेंनी दिली.