Last Updated: Saturday, December 21, 2013, 13:43
एका रुग्णाला ‘ए’ पॉझिटिव्हऐवजी ‘ए’ निगेटिव्ह रक्त दिल्याची घटना ठाण्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडलीय. ठाण्यातल्या वाडा इथं सोनू पांडे नावाचा मुलगा गेल्या १० वर्षापासून भिवंडी सुधारगृहात राहतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या पोटात दुखू लागल्यानं ठाण्यातल्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तपासणीत सोनूच्या पोटातील आतड्यांना गँगरींग झाल्याचं समजलं. त्यामुळं त्याचं ऑपरेशन करावं लागलं.