तर राज ठाकरे यांची संपत्ती जप्त करणार – आर.आर. पाटील

तर राज ठाकरे यांची संपत्ती जप्त करणार – आर.आर. पाटील

Last Updated: Monday, February 17, 2014, 16:31

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या टोलविरोधी आंदोलनात झालेल्या नुकसानीची भरपाई राज ठाकरे यांनी दिली नाही तर आम्ही निवडणूक आयोगाला याची माहिती देऊ तरीही भरपाई दिली नाही तर कराची वसुली करतात तशी त्यांची मालमत्ता जप्त करून वसूली केली जाईल असं गृहमंत्री आर आर पाटील यांनी म्हटलंय.

सेनेचे ‘नया है वह’, तर मनसेचे ‘सोया है यह’

सेनेचे ‘नया है वह’, तर मनसेचे ‘सोया है यह’

Last Updated: Monday, February 17, 2014, 11:03

मनसेने टोलविरोधात केलेले आंदोलन केवळ पाच तासांत आटोपले या आंदोलनावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये ‘नया है वह’ म्हणून अग्रलेख लिहण्यात आला. या अग्रलेखाला उत्तर देण्यासाठी मनसेकडे कोणतेही वृत्तपत्र नाही. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत फेसबुक, वॉट्सअप, ट्विटरवर एक मेसेज टाकला आहे.

राजकीय पक्षांतही `विशाखा समिती`ची गरज

Last Updated: Sunday, February 16, 2014, 23:27

कार्यालयाच्या ठिकाणी स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी १९९७ साली सुप्रीम कोर्टाने विशाखा समितीची स्थापना करण्याचे आदेश प्रत्येक संस्थेला दिले.

मेधा पाटकरांचा राजकीय प्रवेश; प्रस्थापितांना झटका?

Last Updated: Sunday, February 16, 2014, 22:15

`आम आदमी पक्षा`नं लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या २० संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर केलीत. यातील, वेगवेगळ्या आंदोलनांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असणारं नाव म्हणजे मेधा पाटकर...

दोघांचे भांडण... `आरपीआय`ला लाभ?

Last Updated: Sunday, February 16, 2014, 17:55

माढाच्या जागेवरून महायुतीत बेबनाव निर्माण झालाय. माढाची जागा स्वाभीमानी शेतकरी संघटनेला दिल्यामुळं महादेव जानकर नाराज झाल्याचंही म्हटलं जातंय. यातच, रामदास आठवलेंनी या दोघांच्या भांडणाचा लाभ उठवण्याचं ठरवलंय.

पोलीस आयु्क्तपद न मिळाल्यानं विजय कांबळे नाराज?

पोलीस आयु्क्तपद न मिळाल्यानं विजय कांबळे नाराज?

Last Updated: Sunday, February 16, 2014, 15:15

मुंबईच्या पोलीस आयु्क्तपदी नियुक्ती न झाल्यानं विजय कांबळे हे प्रचंड नाराज़ असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत्ये. त्यांची नियुक्ती करण्यात आलेल्या ठाणे आयुक्तपदाचा ते पदभार स्विकारणार नाहीत अशीही खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे.

राज्यातील ८६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील ८६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Last Updated: Sunday, February 16, 2014, 09:16

गृहमंत्री श्री. आर.आर.पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंजूरीनंतर या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.

कोण आहेत राकेश मारिया?

Last Updated: Sunday, February 16, 2014, 08:00

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावर राकेश मारिया यांची निवड करण्यात आलीय. त्यामुळे, अखेर तब्बल १५ दिवसांनी मिळाला मुंबईला पोलीस आयुक्त मिळालाय. कोण आहेत हे राकेश मारिया... पाहुयात...

मुंबई पोलीस आयुक्तपदी राकेश मारिया यांची निवड

Last Updated: Saturday, February 15, 2014, 22:20

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावर राकेश मारिया यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यामुळे, अखेर तब्बल १५ दिवसांनी मिळाला मुंबईला पोलीस आयुक्त मिळालाय.

`महायुती`च्या पाच पांडवांत शकुनीमामा?

Last Updated: Saturday, February 15, 2014, 18:09

पाच पांडव म्हणून एकत्र आलेल्या महायुतीमध्ये सध्या फूट पडण्याची दाट शक्यता निर्माण झालीय... याला कारण आहे ते माढा लोकसभा मतदारसंघाचं.