मुंबई-उपनगरांत अवकाळी पावसाची हजेरी

मुंबई-उपनगरांत अवकाळी पावसाची हजेरी

Last Updated: Saturday, February 15, 2014, 13:04

वीकएन्डला मुंबई आणि उपनगरात अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. त्यामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झालाय. मुंबई आणि उपनगरात सध्या ढगाळ वातावरण आहे. बोरिवली, मालाड, वसई-विरार, भाईंदर, डहाणू तालुक्यातल्या बोर्डी परिसरातही पावसानं हजेरी लावलीय.

अनोखी प्रेमाची गोष्ट..कौटुंबिक न्यायालयाची कमाल

अनोखी प्रेमाची गोष्ट..कौटुंबिक न्यायालयाची कमाल

Last Updated: Saturday, February 15, 2014, 10:39

व्हॅलेन्टाईन डेच्या पार्श्वभूमीवर कौटुंबिक न्यायालयाच्या काऊंसेलिंगनं कमाल केलीय. कारण दुरावलेली मनं एकत्र आणण्याची कमाल या काऊंसेलिंगनं केलीय.. पाहूया ही अनोखी प्रेमाची गोष्ट.

भावाची हत्या केल्यानंतर तो मृतदेहाजवळ बसला रडत

भावाची हत्या केल्यानंतर तो मृतदेहाजवळ बसला रडत

Last Updated: Saturday, February 15, 2014, 08:32

आपल्या लहान भावाचे विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे समजल्यावर चिडलेल्या भावाने रागाच्या भरात त्याला चाकूने भोसकले. हा प्रकार दादरमधील शिवाजी पार्क परिसरात गुरुवारी रात्री घडला. हत्याकेल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भावाच्या मृतदेहाजवळच तो बसून रडत होता. त्याला पोलिसांनी अटक केली.

अखेर सरकारी भूखंड राजीव शुक्ला यांनी केला परत

अखेर सरकारी भूखंड राजीव शुक्ला यांनी केला परत

Last Updated: Friday, February 14, 2014, 15:36

केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांच्या संस्थेनं अखेर अंधेरी येथील कोट्यवधी रूपयांचा वादग्रस्त सरकारी भूखंड सरकार जमा केलाय. २००७ मध्ये राजीव शुक्ला यांच्या `बीएजी` या शिक्षण संस्थेला हा भूखंड देण्यात आला होता.

प्रेयसीला शिव्या दिल्याने भावाने केली भावाची हत्या

प्रेयसीला शिव्या दिल्याने भावाने केली भावाची हत्या

Last Updated: Friday, February 14, 2014, 13:04

फोनवरून प्रेयसीला शिव्या दिल्याने भावाने भावाची हत्या केल्याची घटना मुंबईतील दादरमध्ये उघडकीस आली आहे. राग अनावर झाल्याने भावाला भावाने चाकूने भोसकले.

मुंबईसह उपनरांत पावसाच्या सरी

Last Updated: Friday, February 14, 2014, 08:42

मुंबई,ठाणे आणि नवी मुंबईत आज पहाटे अवकाळी पावसानं हजेरी लावली. मुंबईतल्या शहर भागातल्या परळ वरळीसह वांद्रे आणि बोरिवली भागात पावसाच्या सरी कोसळल्या.

शिवस्मारकाचा निधी, टोल भरपाईसाठी वापरा : राज

शिवस्मारकाचा निधी, टोल भरपाईसाठी वापरा : राज

Last Updated: Thursday, February 13, 2014, 23:40

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी देण्यात आलेला 100 कोटी रूपयांचा निधी टोलची भरपाई करण्यासाठी द्यावा, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे केली.

एसटीच्या टोल रद्दला जयंत पाटलांचा विरोध

एसटीच्या टोल रद्दला जयंत पाटलांचा विरोध

Last Updated: Thursday, February 13, 2014, 21:59

एकीकडे एसटीला टोल पूर्णपणे माफ करावा अशी मागणी केली जात असतांना ग्रामविकास मंत्री जयंत पाटील ह्यांनी मात्र एसटीनेही टोल भरावा असा आग्रह धरला आहे.

टोल नाके बंद, मनसे इम्पॅक्ट नाही - भुजबळ

टोल नाके बंद, मनसे इम्पॅक्ट नाही - भुजबळ

Last Updated: Thursday, February 13, 2014, 21:25

मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या बैठकीतल्या मागण्यांवर सरकारनं यापूर्वीच विचार केल्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केलाय. नव्यानं लागू करण्यात येणा-या टोल धोरणात या सर्व बांबीचा समावेश करण्यात आलाय.

उमेदवाराला सोशल नेटवर्किंगचाही खर्च द्यावा लागणार

उमेदवाराला सोशल नेटवर्किंगचाही खर्च द्यावा लागणार

Last Updated: Thursday, February 13, 2014, 20:39

येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना आता सोशल नेटवर्किंगवर केलेल्या खर्चाचीही माहिती द्यावी लागणार आहे.