लतादीदींच्या घरबांधणीला सरकारचं कोर्टात आव्हान

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 11:16

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कोल्हापुरातील घरबांधणी योजनेला सरकारनं कोर्टात आव्हान दिलंय. मंगेशकर यांची जमीन कमाल नागरी जमीन धारणा कायद्याखाली अतिरिक्त ठरविण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी तिथं घरबांधणी योजना राबविण्याचं ठरविलं. मात्र, ही योजना राबविताना त्यांनी अटी पाळल्या नसल्याचं कारण देऊन सरकारनं त्यांना नुकतीच घरविक्री करण्यास मनाई केली. या निर्णयास मंगेशकर यांनी याचिकेद्वारं आव्हान दिलं आहे.

पवईत ५४ हजारात घराची अफवा कायम

पवईत ५४ हजारात घराची अफवा कायम

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 11:10

पवईमध्ये 54 हजारांत घर मिळणार या अफवेनं मंत्रालयात आज तिसऱ्या दिवशीही अर्ज भरण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत.

मुंबई पोलीस आयुक्तपदी अजून नियुक्ती का नाही?

मुंबई पोलीस आयुक्तपदी अजून नियुक्ती का नाही?

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 11:12

सत्यपाल सिंह यांनी भाजपच्या मेरठ इथल्या रॅलीत कमळ हाती धरल्यामुळे मुंबई सध्या पोलिस आयुक्ताविना आहे. सत्यपालसिंह यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावर अजून कोणाचाही नियुक्ती झालेली नाही. गेले पाच दिवस हे पद रिक्तच आहे.

पालिका बजेटमध्ये काय काय मिळणार मुंबापुरीला?

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 09:39

देशातली सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे बजेटही सर्वाधिक मोठे असते. आज स्थायी समिती बैठकीत वर्ष २०१४-२०१५ साठी पालिकेचं बजेट मांडलं जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचे हे बजेट असल्यानं त्याला अधिक महत्त्व आहे.

अपंग आंदोलकांचा मंत्र्याच्या बंगल्यावर धावा

अपंग आंदोलकांचा मंत्र्याच्या बंगल्यावर धावा

Last Updated: Tuesday, February 4, 2014, 20:01

सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या बंगल्यावर, रात्री उशीरा अपंगांनी आंदोलन करून घोषणाबाजी केली. अपंगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या आंदोलकांनी केलाय.

राज्य सरकारचे कर्मचारी १३ फेब्रुवारीपासून संपावर

राज्य सरकारचे कर्मचारी १३ फेब्रुवारीपासून संपावर

Last Updated: Tuesday, February 4, 2014, 20:01

सरकारी कर्मचारी आणि अधिकारी 13 फेब्रुवारीपासून संपावर जाणारेत. 5 दिवसांचा आठवडा करावा, तसंच केंद्र सरकारप्रमाणे वेतन मिळावे अशी मागणी या कर्मचा-यांनी केलीय.

शिवसेनेचा प्रसिद्धीसाठी गोंधळ - काँग्रेस, १५ जणांना अटक

शिवसेनेचा प्रसिद्धीसाठी गोंधळ - काँग्रेस, १५ जणांना अटक

Last Updated: Tuesday, February 4, 2014, 19:00

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पाकिस्तान कलाकारांविरोधात केलेल्या सेना कार्यकर्त्यांच्या राड्याचं समर्थन केलंय. तर हा आमचा मुद्दा आहे, अशा दावा मनसेनेने केलाय. मात्र, आम्ही शांतीचा संदेश देण्यासाठी आलोय. त्यामुळे हा संदेश देऊन जाणार, असा निर्धार पाकिस्तान कलाकारांनी केलाय. दरम्यान, राड्याप्रकऱणी १५ जणांना अटक करण्यात आलेय.

पाकिस्तानी कलाकारांना विरोधाचा मुद्दा आमचा - मनसे

पाकिस्तानी कलाकारांना विरोधाचा मुद्दा आमचा - मनसे

Last Updated: Tuesday, February 4, 2014, 18:55

पाकिस्तानी कलाकारांना विरोध करण्याचा मुद्दा हा मनसेचा आहे, असा दावा अमेय खोपकर यांनी केला आहे. अमेय खोपकर हे मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत.

शिवसेनेचा इंडो-पाक बॅण्डच्या कार्यक्रमात `गोंधळ`

शिवसेनेचा इंडो-पाक बॅण्डच्या कार्यक्रमात `गोंधळ`

Last Updated: Tuesday, February 4, 2014, 18:53

शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईच्या प्रेस क्लबमध्ये गोंधळ घातला, मेकाल हसन बॅण्डविरोधात हा गोंधळ घातला असल्याचं सांगण्यात येत आहे. इंडो-पाक बॅण्ड विरोधात हा गोंधळ घालण्यात आला आहे.

जगभरातील १४.१ दशलक्ष लोक कॅन्सरच्या विळख्यात

Last Updated: Tuesday, February 4, 2014, 14:03

४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. कर्करोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. कर्करोग हा भारतातल्या रुग्णांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरणाऱ्या १० गंभीर रोगांपैकी एक म्हणून ओळखला जातो.