राष्ट्रवादीचा विजयी होणाऱ्या जागांवर डोळा?

राष्ट्रवादीचा विजयी होणाऱ्या जागांवर डोळा?

Last Updated: Friday, February 7, 2014, 20:32

लोकसभेसाठी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं पद्धतशीरपणे योजना आखलीय. त्यासाठी सुरक्षित आणि विजयाची खात्री असणारेच मतदारसंघ आपल्या पारड्यात पाडून घेतले जातायत. कोकणातल्या रायगड मतदार संघावरही राष्ट्रवादीचा डोळा असल्याचे संकेत मिळतायत.

"गुत्थी"च्या कारने दिली ऑल्टोला धडक, ४ जखमी

Last Updated: Saturday, February 8, 2014, 10:12

कॉमेडी नाइट्स विथ कपिल या शोमधून बाहेर पडलेली गुत्थी म्हणजे सुनील ग्रोवर यांच्या बीएमडब्ल्यू कारने एका ऑल्टो कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अजित पवार, मुंडे, पतंगरावांच्या फ्लॅट्सना जप्तीची नोटीस

अजित पवार, मुंडे, पतंगरावांच्या फ्लॅट्सना जप्तीची नोटीस

Last Updated: Friday, February 7, 2014, 19:06

मुंबईतल्या शुभदा आणि सुखदा सोसायटींना मुंबई महापालिकेनं जप्तीची नोटीस बजावलीय. शुभदा आणि सुखदा या सोसायटींनी १६ कोटींचा मालमत्ता कर थकवल्यानं ही जप्तीची नोटीस बजावण्यात आलीय.या सोसायटींमध्ये अजित पवार आणि गोपीनाथ मुंडेंचे फ्लॅट्स आहे.

CM यांचा घोषणांचा धडाका, तिजोरीत खडखडाट

CM यांचा घोषणांचा धडाका, तिजोरीत खडखडाट

Last Updated: Friday, February 7, 2014, 17:17

निवडणुकींच्या तोंडावर राज्य सरकारनं एका पाठोपाठ एक नव्या योजनांच्या घोषणांचा धडाका लावला आहे. हा कामांचा धडाका लावला तरी सरकारची तिजोरी खाली असल्यानं या योजनांच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हे कसं शक्य होणार आहे, असा सवालही उपस्थित केला. त्यामुळे या घोषणाच ठरण्याची शक्यता आहे.

मुंबई पालिकेची तिजोरी फुल्ल, कामांची बोंब

Last Updated: Friday, February 7, 2014, 16:57

मुंबई महापालिकेनं तब्बल ३१ हजार कोटी रुपयांचे बजेट सादर केले आहे. तर बजेटहून अधिक म्हणजे तब्बल ३३ हजार कोटी रुपयांच्या मुंबई महापालिकेच्या ठेवी विविध बँकांमध्येही आहेत. यावर सामान्यांचा विश्वास बसणार नाही. म्हणजे तिजोरी फुल्ल असली तरी विकास कामात मात्र उदासिनता दिसत आहे.

टोल फोडचा मनसेला भरावा लागणार ‘मोल’

टोल फोडचा मनसेला भरावा लागणार ‘मोल’

Last Updated: Friday, February 7, 2014, 16:01

टोल वसुलीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर संपूर्ण राज्यात मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनामध्ये टोलनाक्यांवरील पावणेचार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुंबई उपनगर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी संबंधित मनसे कार्यकर्त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सुहास अवचट यांच्यावर महिलेचा छेडछाडीचा आरोप

सुहास अवचट यांच्यावर महिलेचा छेडछाडीचा आरोप

Last Updated: Friday, February 7, 2014, 12:33

मुंबईतल्या माहिम भागातील प्रसिद्ध गोवा पोर्तुगिज हॉटेलचे मालक सुहास अवचट यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीये. भारतीय वंशाची कॅनडीयन अभिनेत्रीशी छेडछाड केल्याचा आणि असभ्य वर्तन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

आता मुंबईत `एक कुटुंब एक कार` धोरण

आता मुंबईत `एक कुटुंब एक कार` धोरण

Last Updated: Friday, February 7, 2014, 10:07

मुंबईत एका कुटुंबात एक कार असं धोरण राबवता येईल का याबाबत हायकोर्टानं आरटीओला सूचना केलीय. मुंबईतली ट्रॅफिक जामची समस्या आणि कार पार्किंगची समस्या यामुळं सुटू शकेल असं कोर्टानं आरटीओला म्हटलंय.

मुंबई आयुक्त नियुक्तीवरून काँग्रेस - राष्ट्रवादीत जुंपलीय

मुंबई आयुक्त नियुक्तीवरून काँग्रेस - राष्ट्रवादीत जुंपलीय

Last Updated: Thursday, February 6, 2014, 19:10

मुंबई पोलीस आयुक्तांच्या नियुक्तीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जुंपलीय. पोलीस आयुक्तांच्या नियुक्तीला मुख्यमंत्र्यांमुळं विलंब होत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी फेटाळलाय.

खूशखबर: सीएसटीवरील प्रवाशांची तंगडतोड थांबणार

खूशखबर: सीएसटीवरील प्रवाशांची तंगडतोड थांबणार

Last Updated: Thursday, February 6, 2014, 11:56

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी... आता सीएसटी स्टेशनवर लोकलच्या प्लॅटफॉर्मवरुन लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी आता तंगडतोड करण्याची गरज नाही. एक नवा ब्रीज सीएसटीवर तयार होतोय. तब्बल अठरा प्लॅटफॉर्मसना हा ब्रीज जोडणार आहे.