जुलैमध्ये सुरू होणार ज्युनिअर कॉलेजेस

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 10:40

दहावीचा निकाल लागल्यावर अकरावीचे वर्ग जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक आज शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जाहीर केले. आज निकाल लागताच उद्यापासून म्हणजेच १४ जूनपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन १२ जुलैपर्यंत संपणार आहे.

पाहा दहावीचा निकाल दहा वेबसाईटवर

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 18:44

महाराष्ट्रात एसएससीचा निकाल द्या १३ जून रोजी सकाळी १० वाजता जाहीर होणार आहे. दहावीमधील मुलांची आणि त्यांच्या पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एसएससीचा निकाल नऊ वेगवेगळ्या प्रभागांमधून लागणार आहे.

दहावीचा निकाल 13 जूनला

Last Updated: Sunday, June 10, 2012, 22:23

दहावीचा निकाल 13 जूनला जाहीर होणार आहे. तशी माहिती अधिकृतपणे देण्यात आली. बुधवारी सकाळी हा निकाल वेबसाईटवर जाहीर होणार आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना निकाल पाहणे शक्य होणार आहे.

एकाच वेळी दोन कॉलेजांचा पर्याय

Last Updated: Sunday, June 10, 2012, 10:00

यंदापासून तंत्रशिक्षण संचालनालयानं स्वायत्त आणि बिगर स्वायत्त अभ्यासक्रमांच्या प्रवेश फे-या एकत्रच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन्ही महाविद्यालयांचा पसंतीक्रम देता येणार आहे.

सीईटमध्ये 'ग्रेस मार्क' नाहीच मिळाले...

Last Updated: Saturday, June 9, 2012, 17:17

दुर्गम भागात रुग्णांची सेवा करणार्‍या डॉक्टरांना दिल्या जाणार्‍या १० ते ३० ‘ग्रेस’ मार्कांचा ‘सीईटी’ उत्तीर्ण होण्यासाठी उपयोग करता येणार नाही.

विद्यार्थ्यांनी बनविला रोबोट ऍग्रो ट्रॅक्टर

Last Updated: Saturday, June 9, 2012, 16:13

औरंगाबादच्या एमआयटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतक-यांसाठी खास रोबोट ऍग्रो ट्रॅक्टर निर्माण केलाय.. शेतक-यांची बरीच कामे हा टँक्टर करतो. त्यामुळेच हा मल्टिपर्पज टँक्टर शेतक-यांसाठी वरदानच ठरला आहे.

Exclusive– पाहा MHT-CET निकाल

Last Updated: Saturday, June 9, 2012, 17:23

इंजिनीअरिंग आणि मेडिकल सीईटीचे निकाल उद्या सकाळी जाहीर होणार असून आज टॉपर्सची यादी जाहीर करण्यात आली....त्यात मेडिकल सीईटीमध्ये जालन्याच्या माधवी इंदानी हिनं 198 गुणांसह पहिला क्रमांक पटकावला....

मुंबई विद्यापीठात 'कुंपणच शेत खातय'

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 08:29

मुंबई विद्यापीठाच्या पेपरफुटीत कुंपणानेच शेत खाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पेपर फोडण्यात दोन प्राध्यापक, पाच शिपाई, दोन लॅब असिस्टंट आणि पाच विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

विद्यापीठ पेपरफुटीप्रकरणी ८ जण अटकेत

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 12:13

मुंबई विद्यापीठ पेपरफुटीप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आलीय. मुंबई क्राईम ब्रांचनं ही कारवाई केली असून अटक झालेल्यांमध्ये विद्यापीठ कर्मचा-यांचाही समावेश आहे. आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

आयआयटीत मुस्लिम विद्यार्थ्यांची बाजी

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 18:57

आयआयटी- जेईई या महत्वाच्या तब्बल ४०० परिक्षांत मुस्लिम विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. यापूर्वी अनेक कारणांनी या समाजातील विद्यार्थी या परिक्षांमध्ये चमक दाखवू शकत नव्हते. मात्र हे स्वप्न आता साकार झालंय.