रासबिहारी शाळेचा माज, पालकांना दिली धमकी

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 18:31

नाशिकच्या रासबिहारी शाळेची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शाळेनं मनमानी करत फी वाढ केली. पालकांनी त्याविरोधात आंदोलन केलं. त्यानंतरही शाळेनं दादागिरी सुरूच ठेवली आहे. आता एक धक्कादायक इशारा शाळेनं दिलाय.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने वाढवली 'गुणवत्ता'

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 19:35

पिंपरी चिंचवड महापालिकेनं दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी काही चांगले निर्णय घेतले होते. पण शिष्यवृत्तीसाठीच्या गुणांची पात्रता महापालिकेनं अचानक वाढवली आहे. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

'राजीव गांधी इ-लर्निंग स्कूल'ची मान्यता धोक्यात

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 17:52

पुणे महापालिकेचं राजीव गांधी ई लर्निंग स्कूल ही कोट्यवधी खर्चून उभारलेली हाय प्रोफाईल शाळा आहे. ही शाळा शिक्षणापेक्षा नेहमी वादामुळे चर्चेत राहिली. यावेळचा विषय मात्र अधिक गंभीर आहे. थेट विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्यच यावेळी पणाला लागलंय.

सुमारे दीडशे शाळांचा निकाल शून्य%

Last Updated: Monday, June 18, 2012, 20:57

यावर्षी राज्यातील सुमारे दीडशे शाळांचे निकाल ०% लागलाय. दहावी आणि बारावीच्या शाळांचा यात समावेश आहे. अशा शून्य टक्के निकालांच्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे.

क्लास लावायचायं तर फक्त होर्डींग पाहा...

Last Updated: Saturday, June 16, 2012, 19:13

नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा जाहिरातींचं पेव फुटलं आहे. मात्र शहरात सुरु असलेली फलकबाजी कुठल्याही निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नाही. तर हे होर्डिंगवॉर खासगी क्लासेस आणि शिक्षणसंस्था चालकांमध्ये आहे.

दहावी पास... करिअरच्या अनेक वाटा मोकळ्या

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 17:07

दहावीला कमी मार्क्स मिळाले तर पुढे काय? असा प्रश्न अनेक विद्याथीर्-पालकांसमोर उभा ठाकतो. काही विद्यार्थ्यांना अभ्यासात फारशी रुची नसते. पण ते एखाद्या कलाकौशल्यात निपुण असतात. त्यांच्यातील कौशल्याचा उपयोग करून त्यांना योग्य ते व्यवसाय प्रशिक्षण देणं शक्य असते.

१०वी नंतर पुढे काय?

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 16:22

हा प्रश्न खरंतर आज सर्वच पालकांना व विद्यार्थ्यांना पडलेला असतो. जो तो आपआपल्या परीने उत्तरं शोधत असतो,बहुतेकदा शेजारी-पाजारी नातेवाइक फारफार तर एखादे वर्तमानपत्र ह्यांची मद्त सामान्य पालक व विद्यार्थी घेतात.

दहावीच्या निकालात आम्ही मारली बाजी...

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 14:21

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा एकूण ८१.३२ टक्के लागला आहे. बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८१.३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

पाहा आपला निकाल, कोकणाने मारली बाजी

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 14:25

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा एकूण 81.32 टक्के लागला आहे.

दहावीचा निकाल जाहीर.. कसा लागला निकाल?

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 14:26

आपला निकाल काय आहे.. पाहा या वेबसाईटवर वर... कोणी मारली बाजी... कोणता विभाग आहे पुढे.. आपला निकाल काय आहे.. पाहण्याची उत्सुकता असेलच. त्वरीत पाहा काय आहे आपला निकाल जाणून घ्या.