सीबीएससी दहावीचा निकाल उद्या

Last Updated: Wednesday, May 23, 2012, 16:54

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएससी)च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच २४ मे रोजी जाहीर होणार असल्याची मंडळातर्फे देण्यात आली आहे.

NDAतले विद्यार्थी होणार 'इंजिनिअर'

Last Updated: Tuesday, May 22, 2012, 23:00

इंजिनिअरिंगमध्ये उत्सुक असणाऱ्यांसाठी एक खूषखबर आहे. आणि तीही पुण्यातल्या एनडीएमधून. पुण्यातल्या एनडीएमध्ये आता इंजिनिअरिंगची पदवीही घेता येणार आहे.

शाळेचं शोषण, पालकांचं उपोषण

Last Updated: Tuesday, May 22, 2012, 16:03

नाशिकमध्ये रासबिहारी शाळेनं केलेल्या फी वाढीचा मुद्दा चांगलाच तापलाय. यासंदर्भात आज शाळा व्यवस्थापन आणि पालकांची चर्चा होणार होती. पण अचानक शाळेनं चर्चेला नकार दिला. त्यामुळे पालक चांगलेच संतप्त झालेत.

ICSE परिक्षा, ठाण्याची शलाका देशात पहिली

Last Updated: Saturday, May 19, 2012, 18:03

आयसीएसई आणि आयएससी बोर्डानं आज आपले १० वी आणि १२ वीचे निकाल जाहीर केले. या परिक्षेत ठाण्याच्या शलाका कुलकर्णी आणि धनबादच्या माधवी सींगनं १० वीच्या परिक्षेत भारतातून पहिला क्रमांक पटकावला.

खासगी शाळांपुढं सरकार झुकले

Last Updated: Thursday, May 17, 2012, 08:56

गरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्याच्या निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळानंही या निर्णयाला मंजूर दिलीय. परंतु खासगी शाळांचा या निर्णयाला असलेला विरोध लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यामागे १० हजार २१७ रुपये खासगी शाळांना देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळं खासगी शाळांपुढं राज्य सरकार झुकल्याचं चित्र दिसत आहे.

अभिनव कॉलेज होणार बंद

Last Updated: Tuesday, May 15, 2012, 23:53

पुण्यातलं अभिनव कला महाविद्यालय बंद होणार आहे. आर्थिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. सध्या सुट्टी सुरू असली तरी विद्यार्थी कॉलेजमध्ये जमतात.

सावधान... हजारो शाळा होणार आहेत बंद!

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 17:00

राज्यातल्या दोन हजार सहाशे शाळा बंद होणार आहेत. ज्या शाळांमध्ये पन्नास टक्क्यांहून जास्त अनुपस्थिती आढळलीय. त्या शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे.

दहावी-बारावीचा निकाल कधी?

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 14:00

दहावी-बारावीचा निकाल यंदा लवकरच लागेल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी औरंगाबाद येथे दिली. बारावीचा निकाल २३ मे तर दहावीचा निकाल १३ जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

पीएचडीच्या विद्यार्थ्यांचं भीक मांगो आंदोलन

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 10:09

पुणे विद्यापीठातल्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी भीक मांगो आंदोलन केलं. मागील तीन वर्षांपासून हक्काचं विद्यावेतन मिळावं यासाठी हे विद्यार्थी सातत्यानं झगडत होते.

आज रेल्वेची 'मेगा परीक्षा'

Last Updated: Sunday, May 6, 2012, 12:05

आज रेल्वे भरती बोर्डाची परीक्षा होते आहे. मुंबई आणि उपनगरांतील अनेक परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीची रेल्वे बोर्डाची सर्वात मोठी परीक्षा असल्याचं सांगण्यात येत आहे.