सॅमसंगचा नवा कर्व्ह्ड डिस्प्ले `गॅलॅक्सी राऊंड` फोन बाजारात

सॅमसंगचा नवा कर्व्ह्ड डिस्प्ले `गॅलॅक्सी राऊंड` फोन बाजारात

Last Updated: Thursday, October 10, 2013, 10:53

मोबाईल फोनच्या बाजारात सॅमसंगनं नवा धमाल फोन बुधवारी लॉन्च केलाय. सॅमसंगनं लॉन्च केलेल्या ‘गॅलॅक्सी नोट’सोबतच आणखी एक ‘स्मार्ट कर्व्ह्ड डिस्प्ले’ फोन ज्याची स्क्रीन फ्लेक्सिबल आहे असा फोन बाजारात आणलाय. काल कोरियात याचं लॉन्चिंग करण्यात आलं.

`गुगल सर्च`मध्ये नरेंद्र मोदींचा पहिला नंबर!

`गुगल सर्च`मध्ये नरेंद्र मोदींचा पहिला नंबर!

Last Updated: Wednesday, October 9, 2013, 23:12

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीं सोशल नेटवर्किंग साईट्सवर लोकप्रिय ठरत असतानाच गुगल या सर्च इंजिनवरही मोदी सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेते ठरले आहेत.

पुण्याच्या एस पी कॉलेजमध्ये अॅडमिशन घोटाळा

पुण्याच्या एस पी कॉलेजमध्ये अॅडमिशन घोटाळा

Last Updated: Wednesday, October 9, 2013, 22:01

पुण्याच्या एस पी कॉलेजमध्ये ऍडमिशन घोटाळा समोर आलाय. अकरावीच्या वर्गात तब्बल ९६ विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे प्रवेश देण्यात आले आहेत.

आता फोनवरही करा पासपोर्टसाठी अर्ज...

आता फोनवरही करा पासपोर्टसाठी अर्ज...

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 13:40

पासपोर्टसाठी अर्ज दाखल करणं आता आणखी सोप्पं होणार आहे. परदेश मंत्रालयानं लवकरच एक ‘मोबाईल अॅप्लिकेशन’ लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय.

`स्टाईल`सह धोनीची एन्ट्री!

`स्टाईल`सह धोनीची एन्ट्री!

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 09:22

अशोक लेलँडनं मोठ्या ‘स्टाईल’मध्ये चार चाकी वाहनांच्या बाजारात एन्ट्री घेतलीय. महेंद्रसिंग धोनीच्या हस्ते ‘स्टाईल’ ही मल्टी पर्पज व्हेईकल (MPV) बाजारात नुकतीच लॉन्च करण्यात आलीय.

ऑनलाईन वर- वधू संशोधकांची ७ महिन्यांत १२४ % वाढ

ऑनलाईन वर- वधू संशोधकांची ७ महिन्यांत १२४ % वाढ

Last Updated: Monday, October 7, 2013, 18:36

विवाह पोर्टलवर वधू किंवा वर शोधण्यासाठी नाव नोंदणी करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. याच वर्षीच्या जानेवारीपासून ते जुलैपर्यंत विवाहासाठी नावनोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत १२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सावधान- ‘अॅडोब’ सॉफ्टवेअर हॅक, ३० लाख ग्राहकांची माहिती चोरीला!

सावधान- ‘अॅडोब’ सॉफ्टवेअर हॅक, ३० लाख ग्राहकांची माहिती चोरीला!

Last Updated: Monday, October 7, 2013, 13:43

दिवसेंदिवस हॅकर्स हल्ले वाढतांना दिसतायेत. काही दिवसांपूर्वी ट्रू-कॉलर अॅप हॅक झालं होतं. आता मात्र हॅकर्सनी अॅडोब या कंपनीवर सायबर हल्ला करून कंपनीची गुप्त माहिती चोरल्याचं वृत्त कळतंय.

इन्कम टॅक्स वाचवायचाय? बायकोला द्या घरभाडं!

Last Updated: Thursday, October 3, 2013, 12:41

नुकताच इन्कम टॅक्स कोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. जर तुम्हाला इन्कम टॅक्स वाचवायचा असेल आणि तुमचं राहतं घर पत्नीच्या नावावर असेल, तुमची बायकोही नोकरी करणारी असेल, तर तुम्ही बायकोलाच घरभाडं देऊन वर्षभराच्या घरभाड्यावर इन्कम टॅक्समध्ये सूट मिळवू शकता. असं करणं बेकायदेशीर नाही, असा निकाल देऊन इन्कम टॅक्स कोर्टानं नोकरदारांसाठी टॅक्स बचतीचा राजमार्ग खुला केलाय.

बँकिंग क्षेत्रात ३० टक्के नोकऱ्यांमध्ये होणार वाढ

Last Updated: Friday, October 4, 2013, 06:09

तुमच्यासाठी एक खूश खबर आहे. बँकिंग क्षेत्रात आता नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. बॅंकेत नव्याने ३० टक्के नोकर भरती होण्याचे संकेत मिळाले आहेत. अनेक बॅंकांनी आपल्या शाखांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या शाखांमध्ये मोठ्याप्रमाणात मनुष्य बळाची गरज भासणार आहे.

मायक्रोसॉफ्टमधून गेट्‌स होणार पायउतार?

मायक्रोसॉफ्टमधून गेट्‌स होणार पायउतार?

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 13:42

मायक्रोसॉफ्टमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तीन गुंतवणूकदारांनी बिल गेट्स यांची व्यवस्थापन समितीमधून गच्छंती करावी अशी मागणी केलीय. त्यामुळं कंपनीचे सहसंस्थापक अध्यक्ष बिल गेट्स यांना पायउतार व्हावं लागल्याची शक्यता आहे.