जी-८ मधून रशियाची हकालपट्टी, रशियाला इशारा

जी-८ मधून रशियाची हकालपट्टी, रशियाला इशारा

Last Updated: Wednesday, March 19, 2014, 10:26

युक्रेनमध्ये कोणालाही न जुमानता आपले सैन्य घुसविण्याचा निर्णय रशियाला चांगलाच महाग पडलाय. युक्रेनमधील हस्तक्षेप रशियाला भोवल्याचे दिसत आहे. क्रिमियाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून रशियाने मान्यता दिली. तसेच क्रिमियाला सामावून घेण्याच्या करारावर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर जी-८ मधून रशियाची हकालपट्टी करण्यात आली आहे.

एका मोबाईल नंबरसाठी मोजले १३ करोड रुपये!

Last Updated: Wednesday, March 19, 2014, 08:38

इतर देशांप्रमाणे भारतातही या व्हीआयपी नंबरसाठी लिलाव सुरू झाला. आत्तापर्यंत हा लिलाव गाड्यांपुरता मर्यादित होता... पण, आता मोबाईल नंबरसाठीही लिलाव सुरू झालाय.

महिलेच्या डोक्यातून ४८ वर्षांनी गोळी काढली

महिलेच्या डोक्यातून ४८ वर्षांनी गोळी काढली

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 23:08

चीनमधील एका 62 वर्षाच्या महिलेच्या डोक्यातून सर्जरीच्या सहाय्याने गोळी काढण्यात आली. ही गोळी मागील ४८ वर्षांपासून या महिलेच्या डोक्यात होती.

भाजप, मोदी आणि विकीलीक्स

भाजप, मोदी आणि विकीलीक्स

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 20:17

भाजपने विकीलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांचा फोटो असलेल्या पोस्टरची चौकशी करण्याची तयारी दर्शवली आहे.

४५ कोटी वर्षां पूर्वीच्या सागरी जीवाश्माचा शोध!

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 13:18

ब्रिटनमधील युनिवर्सिटी ऑफ लिसेस्टरच्या भूस्तरशास्त्राचे प्राध्यापक डेव्हिड सिवेटर यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांना जीवश्म असलेली आकृती सापडली आहे.

`क्रिमिया`ला स्वतंत्र देश म्हणून रशियाची मान्यता

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 09:56

शीतयुद्धानंतर मॉस्कोविरुद्ध लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधांवर टीका करत रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी यूक्रेनच्या `क्रिमिया` या भागाला `स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण देश` म्हणून मान्यता दिलीय.

बेपत्ता मलेशियन विमान तालिबानमध्य़े?

बेपत्ता मलेशियन विमान तालिबानमध्य़े?

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 14:16

बेपत्ता मलेशियन विमान तालिबानच्या हद्दीत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसा संशय अधिक बळावला आहे. शुक्रवारी ८ मार्चपासून मलेशियाचे २३९ प्रवासी असलेले विमान बेपत्ता आहे. त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. हे विमान समुद्रात कोसळ्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शोध मोहीमेत त्याचा ठावठिकाणा लागेला नाही.

पाकिस्तानमध्ये मंदिर आणि धर्मशाळेला आग!

Last Updated: Monday, March 17, 2014, 19:49

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात शनिवारी रात्री एक धक्कदायक घटना घडलीय. एका धर्मग्रंथाला अपवित्र केल्याचा राग धरून रागावलेल्या लोकांनी एक मंदिर आणि एक धर्मशाळेला आग लावली.

बेपत्ता विमानाचा शोध ११ देशांमध्ये, पायलटच्या भूमिकेवर संशय

बेपत्ता विमानाचा शोध ११ देशांमध्ये, पायलटच्या भूमिकेवर संशय

Last Updated: Monday, March 17, 2014, 09:31

मलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध आता ११ देशांमध्ये घेतला जातोय. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या पायलटच्या भूमिकेवर संशय असून त्याच्या घरी सापडलेल्या सिम्युलेटरची चाचणीही घेतली जातेय. विमानाच्या पायलटला रडारपासून कसं वाचायचं हे माहित होतं. त्यामुळं विमान हायजॅक झालं का? दहशतवाद्यांचा यात काही हात आहे का? या सर्व शक्यतांचा तपास मलेशिया तपास अधिकारी करत आहेत.

नेपाळच्या पंतप्रधानांची संपत्ती, फक्त २ मोबाईल

नेपाळच्या पंतप्रधानांची संपत्ती, फक्त २ मोबाईल

Last Updated: Sunday, March 16, 2014, 22:51

नेपाळचे नवे पंतप्रधान सुशील कोईराला यांची संपत्ती आम आदमी सारखीच आहे. एखाद्या पंतप्रधानांची संपत्ती किती असेल, असा प्रश्न विचारला तर शालेय विद्यार्थीही कोट्यवधींची असे उत्तर अगदी सहज देतील. मात्र, नेपाळच्या नव्या पंतप्रधानांबाबत हे उत्तर बरोबर ठरणार नाही.