नाटक संपलं...`मीरपूरच्या हैवाना`ची फाशीची शिक्षा कायम!

Last Updated: Thursday, December 12, 2013, 17:21

बांग्लादेशच्या सुप्रीम कोर्टानं १९७१ साली मानवता विरोधी गुन्ह्यासाठी ‘जमात-ए-इस्लामी’ या पक्षाच्या धर्मांध नेत्याची – अब्दुल कादिर मुल्लाची – फाशीची शिक्षा कायम ठेवलीय.

ओबामा तिच्याबरोबर बोलले अन् मिशेलचा पारा चढला

Last Updated: Thursday, December 12, 2013, 14:40

कोणत्याही स्त्रीला आपला नवरा दुसऱ्या कोणत्याही महिलेबरोबर जास्त जवळून बोलेला आवडत नाही. तसाच प्रसंग हा मिशेल ओबामा यांच्याबाबतीत घडला आहे. जोहान्सबर्गवर मंगळवारी नेल्सन मंडेला यांना श्रद्धांजली देण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल पोहोचले होते. यावेळी ओबामा डेनिश प्रधानमंत्री हॅले थॉर्निग हिच्याशी गप्पा मारल्या अन् इथंच मिशेल यांचा पारा चढला.

सिंगापुरात भारतीय तरुणाचा घात की अपघात?

Last Updated: Tuesday, December 10, 2013, 17:49

सिंगापूरमध्ये ‘छोटा भारत’ म्हणून ओळखला जाणारा हॅम्पशायर हा रस्ता आणि रेस कोर्स रस्ता या भागात एका भारतीय मजुराचा बसच्या धडकेत मृत्यू झाला. या अपघातानंतर शहरात उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी २४ भारतीयांसह २७ दक्षिण आशियायी मजुरांना अटक करण्यात आली आहे. तसेच या अटकेत एक स्थानिक आणि दोन बांगलादेशी मजुरांचादेखील समावेश आहे. हा अपघात झाल्यानंतर रात्री तिथे जमलेल्या ४०० जणांच्या जमावाने खाजगी बसची नासधूस केली.

नेल्सन मंडेला श्रद्धांजली:  दक्षिण आफ्रिकेत १० दिवस शोकसभा

नेल्सन मंडेला श्रद्धांजली: दक्षिण आफ्रिकेत १० दिवस शोकसभा

Last Updated: Sunday, December 8, 2013, 10:52

दक्षिण आफ्रिकेतील महात्मा म्हणून समजले जाणारे नेल्सन मंडेला यांच्यावर १५ डिसेंबर रोजी होणाऱ्या अंत्यसंस्काराची तयारी ही शनिवारीच सुरु करण्यात आली आहे. तसंच त्यांची शोकसभा १० दिवस चालणार आहे. या शोकसभेत जगभरातून असंख्य लोक आणि नेते मंडळी येण्याची शक्यता आहे. जोहान्सबर्ग या ९५,००० सीटची क्षमता असलेल्या स्टेडियमवर मंगळवारी मंडेला यांची शोकसभा होणार आहे. या शोकसभेत मोठ्या प्रमाणावर जनता एकत्रित येण्याची शक्यता आहे.

वर्णभेदविरोधी नायक नेल्सन मंडेला यांचे निधन

वर्णभेदविरोधी नायक नेल्सन मंडेला यांचे निधन

Last Updated: Friday, December 6, 2013, 07:56

दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांचं जोहान्सबर्गमध्ये निधन झालंय.. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.. गेल्या काही महिन्यांपासून मंडेला फुफ्फुसाच्या आजारानं त्रस्त होते..

बराक ओबामांच्या आयफोन वापरण्यावर बंदी!

बराक ओबामांच्या आयफोन वापरण्यावर बंदी!

Last Updated: Thursday, December 5, 2013, 14:56

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना सुरक्षेच्या कारणासाठी आयफोन वापरू दिला जात नसल्याचं स्पष्ट झालंय. व्हाईट हाऊसमध्ये युवकांसाठी आयोजीत करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ओबामा बोलत होते. त्यावेळी त्यांना सुरक्षेच्या कारणासाठी आयफोन वापरण्यास बंदी असल्याचं म्हटलं.

एडवर्ड स्नोडेन दिल्लीतच शिकला कॉम्प्युटर हॅकिंग

Last Updated: Thursday, December 5, 2013, 11:49

अमेरिकेच्या ‘प्रिज्म’ या हेरगिरीची प्रकल्पाचा भंडाफोड करणाऱ्या एडवर्ड स्नोडेननं कॉम्प्युटर हँकिंगचं तंत्रशुद्ध ज्ञान नवी दिल्लीतच घेतलंय. दिल्लीच्या कोइंग सोल्यूशन या इन्स्टिट्यूटमधून स्नोडेननं हे शिक्षण घेतलंय. या इन्स्टिट्यूटनंच ही माहिती प्रसिद्ध केलीय.

परवेझ मुशर्रफांना ठार करणाऱ्याला दोन अब्ज बक्षीस

परवेझ मुशर्रफांना ठार करणाऱ्याला दोन अब्ज बक्षीस

Last Updated: Thursday, December 5, 2013, 11:10

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना ठार मारणाऱ्याला दोन अब्ज रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. हे बक्षीस जाहीर केलंय पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील नेते अकबर बुगटी यांच्या मुलानं...

टॉप १० : जगातील सर्वांत जास्त भ्रष्टाचारी देश...

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 16:25

‘ग्राफ्ट वॉचलॉग ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेनं जगातील देशांचं सर्वेक्षण करून भ्रष्टाचारात आघाडीवर असलेल्या देशांची एक यादी जाहीर केलीय... एक नजर टाकुयात सर्वात कमी भ्रष्टाचार आढळला त्या देशांवर...

टॉप १० : जगातील सर्वांत कमी भ्रष्टाचारी देश....

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 16:25

‘ग्राफ्ट वॉचलॉग ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेनं जगातील देशांचं सर्वेक्षण करून भ्रष्टाचारात आघाडीवर असलेल्या देशांची एक यादी जाहीर केलीय... एक नजर टाकुयात सर्वात जास्त भ्रष्टाचार आढळला त्या देशांवर...