अमेरिकेचा उर्मटपणा कायम, देवायनींचा मेल

अमेरिकेचा उर्मटपणा कायम, देवायनींचा मेल

Last Updated: Thursday, December 19, 2013, 07:36

अमेरिकेतील भारतीय दुतावास कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत देण्यात आलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल भारतामध्ये संतापाची लाट उसळलीय. परंतु तरीही अमेरिकेचा उर्मटपणा अद्याप कमी झालेला नाही. झाल्या प्रकाराबद्दल माफी मागण्याऐवजी अमेरिकेने चक्क या कृत्याचं समर्थन केलंय.

अमेरिकेच्या समलैंगिक अधिकाऱ्यांना भारतात अटक होणार?

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 11:47

भारताच्या दूतावास अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत मिळालेल्या अत्यंत अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ भारतानंही कधी नव्हे ते अमेरिकेला शिंगावर घेतलंय... खोब्रागडे प्रकरणामुळं भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध ताणले गेलेत.

अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना ओळखपत्र परत करण्याचे आदेश

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 14:31

अमेरिकेच्या भारतीय राजनैतिक महिला अधिकाऱ्याला दिलेल्या या अपमानास्पद वागणुकीनंतर भारतानं अमेरिकेला भारतात तैनात केलेल्या आपल्या सगळ्या राजनैतिक अधिकाऱ्यांची ओळखपत्र परत करण्याचे आदेश दिलेत.

डॉ. देवयानी खोब्रागडे यांची अमेरिकेत कपडे उतरवून चौकशी

डॉ. देवयानी खोब्रागडे यांची अमेरिकेत कपडे उतरवून चौकशी

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 13:03

भारताच्या राजनैतिक अधिकारी डॉ. देवयानी खोब्रागडे यांची चक्क कपडे उतरवून चौकशी करण्यात आली. शिवाय अट्टल गुन्हेगार असलेल्या तुरूंगात ठेवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत भारताने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या शिष्टमंडळास भेट देण्याचे भारताने टाळले आहे.

हार्वर्ड यूनिवर्सिटीमध्ये बॉम्बची बोंबाबोंब

हार्वर्ड यूनिवर्सिटीमध्ये बॉम्बची बोंबाबोंब

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 15:12

हारवर्ड यूनिवर्सिटीमध्ये बॉम्ब ठेवल्याची बोंबाबोंब होताच पूर्ण विद्यापीठ खाली करण्यात आले. तसेच विद्यापीठातील होणारी परीक्षाही रद्द करण्यात आली. बॉम्ब ठेवल्याचे वृत्त समजतात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान, ही अफवा असल्याचे चौकशीनंतर समजले.

पायलटला `सॅण्डविच`ची लहर; प्रवाशांवर केला कहर

Last Updated: Monday, December 16, 2013, 13:25

एका सॅण्डविचसाठी पायलटनं दोन तास प्रवाशांची त्रेधातिरपीट उडविली... ही घटना घडलीय पाकिस्तानमध्ये...

नेल्सन मंडेला यांना अखेरचा निरोप!

नेल्सन मंडेला यांना अखेरचा निरोप!

Last Updated: Sunday, December 15, 2013, 15:40

वर्णद्वेषविरोदी लढ्याचे प्रणेते आणि दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष दिवंगत नेल्सन मंडेला यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आलेत. अंत्यसंस्कारासाठी मंडेला यांचं पार्थीव विमानान त्यांच्या जन्मगावी आणण्यात आलं.

आदर्श सोसायटी सदस्य देवयानी खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमध्ये अटक

आदर्श सोसायटी सदस्य देवयानी खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमध्ये अटक

Last Updated: Saturday, December 14, 2013, 07:09

माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्या कन्या आणि वादग्रस्त आदर्श सोसायटीच्या सदस्य असलेल्या डॉ. देवयानी खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आलीय.

अजब-गजब : सहा वर्षांच्या मुलानं केला लैंगिक छळ!

Last Updated: Thursday, December 12, 2013, 21:50

वय केवळ सहा वर्ष... आपल्याच वयाच्या मुलीचा केला लैंगिक छळ... तुम्ही, म्हणाल कसं शक्य आहे हे? पण, हाच ठपका ठेवत या सहा वर्षांच्या विद्यार्थ्याला त्याच्या शाळेनं शाळेतून निलंबीत केलंय.

अबब... एका लग्नासाठी ५०३ कोटींचा खर्च!

Last Updated: Thursday, December 12, 2013, 18:49

देशात भूकमारीमुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागत असताना दुरीकडे याच देशात लोक करोडो रुपये खर्च करत आहे ते फक्त लग्नासाठी पाण्यासारखा पैसा ओतायला तयार आहे. उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांची भाची सृष्टी मित्तल हीच लग्न स्पेनमध्ये बार्सिलोना या शहरात झाले. या लग्नामध्ये ५०३ करोड रुपये पेक्षाही अधिक खर्च करण्यात आला. त्या दिवशी बार्सिलोना पूर्ण पणे थांबून गेले. सृष्टी मित्तल ही लक्ष्मी निवास यांच्या लहान भावाची प्रमोद मित्तल यांची मुलगी आहे.