एके -४७ रायफल निर्मात्याचे निधन

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 18:14

जगभरात प्रसिद्ध झालेल्या कॅलेशनिकोव्ह रायफल म्हणेजच एके रायफलचा निर्माता मिखाईल कॅलेशनिकोव्ह यांचं निधन झालं. तत्कालीन युएसएसआरसाठी त्यांनी सर्वप्रथम एके-४७ य़ा रायफलची निर्मिती केली होती. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांनी निर्माण केलेली अव्हटोमॅट कॅलेशनिकोव्ह ४७ म्हणजेच एके -४७ ही असॉल्ट रायफल जगभरात अतिशय प्रसिद्ध झाली.

चिमुरड्यासह वडिलांची ५२ व्या मजल्यावरून उडी

चिमुरड्यासह वडिलांची ५२ व्या मजल्यावरून उडी

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 17:10

कौटुंबिक वाद हे प्रत्येकाच्या घरात असतात, पण त्यांचा सामना करून त्यातून मार्ग काढण्याची कसरत ही स्त्री-पुरूषांना करावी लागते. पण असा मार्ग काढता आला नाही म्हणून न्यू यॉर्कमधील एका व्यक्तीने स्वतःच्या तीन वर्षाच्या मुलाला ५२ व्या मजल्यावरून फेकून स्वतः नंतर उडी घेतली.

बॉबी जिंदाल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत

Last Updated: Monday, December 23, 2013, 18:48

मूळ भारतीय वंशाचे असलेले रिपब्लिकन पार्टीचे वरिष्ठ नेते आणि लुसियाना प्रांताचे सद्य गव्हर्नर बॉबी जिंदाल २०१६ मध्ये अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सज्ज होत आहेत.

चोराला मिळाली अश्लिल टेप, लैंगिक शोषण करणारा गजाआड

चोराला मिळाली अश्लिल टेप, लैंगिक शोषण करणारा गजाआड

Last Updated: Monday, December 23, 2013, 16:24

तुम्हांला वाटत असेल की जगातील सर्व गुन्हेगार एकसारखेच वागतात, तर ही बातमी वाचा तुमचे मत बदलेल. दक्षिण स्पेनच्या जेन शहरात एका चोराने लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका व्यक्तीला पडून दिले आहे. पण चोर स्वतः समोर आला नाही.

फ्रान्समध्ये जगातील पहिलं कृत्रिम हृदयरोपण यशस्वी!

फ्रान्समध्ये जगातील पहिलं कृत्रिम हृदयरोपण यशस्वी!

Last Updated: Monday, December 23, 2013, 09:20

जगात पहिल्यांदाच फ्रान्समध्ये एका ७५ वर्षीय पुरुषावर यशस्वीपणे कृत्रिम हृदयरोपण शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आलंय. या शस्त्रक्रियेमुळं या वयोवृद्ध रुग्णाचं आयुष्य पाच वर्षांनी वाढविण्यात डॉक्टरांना यश मिळालं.

<b><font color=red>व्हिडिओ:</font></b> आता तुमचं कुरिअर येणार असं... <b><font color=#3333cc>अॅमेझॉन प्राईम एअर!</font></b>

व्हिडिओ: आता तुमचं कुरिअर येणार असं... अॅमेझॉन प्राईम एअर!

Last Updated: Sunday, December 22, 2013, 16:47

जसजसे सणांचे दिवस येतात... तसे गिफ्ट कुरिअरनं वेळेत पोहोचतील की नाही यांची चिंता लागलेली असते. पण आता यूएस पोस्टल आणि फेडेक्स पोस्टल सर्व्हिस हे कुरिअर सुट्टीच्या दिवशीही तुमच्या घरी पोहोचवणार आहेत. त्यासाठी एक वेगळा प्रयोग त्यांनी केलाय...

दक्षिण सुदानमधील हल्ल्यात तीन भारतीय जवानांचा मृत्यू

Last Updated: Friday, December 20, 2013, 21:52

दक्षिण सुदानमध्ये झालेल्या हल्यात संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेतील तीन भारतीय जवानांचा शुक्रवारी मृत्यू झाला. शांती सेनेच्या तळावर बंडखोरांच्या टोळीने हल्ला केला. या हल्ल्यात तीन भारतीय जवान मृत्यूमुखी पडले.

देवयानी प्रकरणः अमेरिकेचा अडेलतट्टूपणा कायम

देवयानी प्रकरणः अमेरिकेचा अडेलतट्टूपणा कायम

Last Updated: Friday, December 20, 2013, 11:13

न्यूयॉर्कमधील भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्याशी झालेल्या कथित गैरवर्तणुकीसंदर्भात अमेरिकेने माफी मागावी, तसेच त्यांच्यावर आरोप मागे घ्यावे या भारताच्या मागण्या फेटाळून लावल्या आहे. देवयानी यांना गेल्या आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आली होती.

सलग ३० तास काम केल्यानं कॉपीरायटरचा मृत्यू

सलग ३० तास काम केल्यानं कॉपीरायटरचा मृत्यू

Last Updated: Thursday, December 19, 2013, 13:05

मेहनत केल्यानं कोणी मरत नाही, अशी म्हण असते. मात्र मेहनत केल्यानं एकाचा मृत्यू झालाय. सलग ३० तास काम केल्यानं इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथल्या कॉपीरायटरचा मृत्यू झाला. ही महिला कॉपीरायटर असून ती ३० तास काम करत असतांना अजिबात झोपलेली नव्हती.

देवयानी प्रकरणी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला खेद

देवयानी प्रकरणी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला खेद

Last Updated: Thursday, December 19, 2013, 09:19

न्यूयॉर्कमधील भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना करण्यात आलेली अटक आणि देण्यात आलेली अपमानास्पद वागणुकीबाबत अमेरिकेनं अखेर माफी मागितलीय.