अल कायदा नवीन टीमच्या कामाला

Last Updated: Saturday, April 27, 2013, 12:53

दहशतवादी संघटना अल कायदा नवी टीम तयार करण्याच्या कामाला लागलंय. धक्कादायक बाब म्हणजे फक्त पाच ते आठ वर्षांच्या मुलांना यामध्ये ट्रेनिंग दिलं जातंय. पाहुयात हा खळबळजनक रिपोर्ट.

सरबजीतवर लाहोरमध्ये हल्ला, प्रकृती चिंताजनक

Last Updated: Saturday, April 27, 2013, 13:06

पाकिस्तानच्या तुरूंगात हेरगिरीच्या आरोपाखाली डांबण्यात आलेल्या भारतीय सरबजीतवर कोट लखपत जेलमध्ये काही कैद्यानी प्राणघातक हल्ला केला. जड वस्तूच्या साहाय्याने मारहाण केल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सरबजीत `डीप कोमात` आहे.

घटस्फोट घेण्याची विचित्र परंपरा

Last Updated: Friday, April 26, 2013, 16:11

मलायाच्या सुदूर जंगलीत वास्तव्य करणाऱ्या आदिवासींमध्ये घटस्फोट घेण्याची विचित्र परंपरा आहे. एखाद्याला स्वत:च्या पत्नीला घटस्फोट घ्यायचा असेल तर, त्याला आपल्या संपूर्ण समुहातील लोकांना निमंत्रित करावे लागते.

लोगान विमानतळावर आझम खान यांची कसून चौकशी

Last Updated: Saturday, April 27, 2013, 15:53

बोस्टनमधील लोगान आंतरराष्ट्रीय विमानतळावर उत्तर प्रदेशचे मंत्री आजम खान यांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीची गंभीरता लक्षात घेता भारतीय दूतावसांनी अमेरीकी विदेशी विभागाला वेठीस धरले आहे.

परवेझ मुशर्रफांचा जामीन अर्ज फेटाळला

Last Updated: Thursday, April 25, 2013, 18:20

पाकिस्तान कोर्टाने माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचा जामीन अर्ज फेटाळला. मुशर्रफ यांच्या वकिलानीं अंतिम जामिनाचा अवधी वाढवण्याचा आग्रह केला होता. हा जामीन अर्ज लाहोर हाय कोर्टाच्या रावळपिंडी खंडपीठाकडून फेटाळण्यात आला.

सीमा घुसखोरीनंतर चीनची भारतात हवाई घुसखोरी

Last Updated: Thursday, April 25, 2013, 15:57

चीनची दादागिरी सुरुच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. भारतीय सीमेवर घुसखोरी केल्यानंतर आता ड्रॅगननं हवाई घुसखोरी केल्याचं उघड झालंय. चीनच्या दोन हेलिकॉप्टर्सनी भारतीय लेहच्या चुमार भागात घुसखोरी केल्याचं वृत्त पीटीआयनं दिलंय.

अमेरिकेनंतर चीनमध्ये बॉम्बस्फोट, २१ ठार

Last Updated: Wednesday, April 24, 2013, 21:36

अमेरिकेत साखळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर चीनलाही दहशतवाद्यांनी टार्गेट केले आहे. चीनमध्ये जिनजियांग प्रांतात दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात २१ लोक ठार झालेत.

आठ मजली इमारत कोसळून ८० ठार

Last Updated: Wednesday, April 24, 2013, 20:29

बांग्लादेशची राजधानी ढाकामध्ये एक आठ मजली इमारत कोसळून ८० लोकांचा बळी गेला. इमारत दुर्घटनेत ७०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

भारताने केले चीनला हद्दपार!

Last Updated: Wednesday, April 24, 2013, 14:43

लडाखमध्ये चीनने केलेली घुसखोरी लक्षात घेता भारताने चीनला त्याबाबत खडसावले आहे. चीन आणि भारताचे लष्कर आमने-सामने आल्याचेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले.

बोस्टन बॉम्बस्फोट: संशयिताला मृत्यूदंडाची शिक्षा?

Last Updated: Tuesday, April 23, 2013, 12:58

बोस्टन बॉम्बस्फोटाचा संशयित आरोपी जोखर सरनाएवला मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकीत घातपात करण्यासाठी हे बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप त्यावर लावण्यात आला आहे.