अखेर अशर्रफ निवडणूक लढवणार

Last Updated: Tuesday, April 23, 2013, 12:00

माजी प्रधानमंत्री राजा परवेज अशर्रफ यांना निवडणूक लढण्याची अनुमती मिळाली. पाकिस्तान कोर्टाने हा महत्वपूर्ण निकाल मानला जात आहे. निवडणूक समितीने भ्रष्टाचाराच्या आरोप लावून अशर्रफ यांचे निवडणूक उमेदवार अर्ज फेटाळला होता.

चीन भूकंपांमध्ये मृतांची संख्या १९२

Last Updated: Tuesday, April 23, 2013, 11:57

चीनच्या स्वतंत्र मंगोलिया भागात ५.३ भूंकपाचे झटके जाणवले. चीनमधील शिचुआना प्रांतात शनिवारी झालेल्या भूकंपात मृतांची संख्या १९२ वर पोहोचली आहे. तर १२ हजारांहून अधिक लोक जखमी असून २३ जणांचा थांगपत्ता लागलेला नाही.

परवेज मुशर्रफ न्यायालयीन कोठडीत

Last Updated: Sunday, April 21, 2013, 08:15

पाकिस्तानात आणीबाणी लादल्याप्रकरणी माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना शुक्रवारी अटक झाल्यानंतर इस्लामाबादेतील दहशतवाद विरोधी न्यायालयाने शनिवारी १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ मे रोजी होणार आहे.

बोस्टन बॉम्बस्फोट : एक संशयित ठार, दुसरा अटकेत

Last Updated: Saturday, April 20, 2013, 16:36

बोस्टन बॉम्बस्फोट प्रकरणी अमेरिकेन पोलिसांनी एका तरुणाला अटक केलीय. बॉम्बस्फोटा दरम्यान संशयित म्हणून नजरेत आलेल्य दोन तरुणांपैकी हा एक तरुण हे. तर दुसऱ्याचा संशयित तरुणाचा पोलीस चकमकीत मृत्यू झालाय.

पाकचा माजी ‘लष्करशहा’ अखेर अटकेत

Last Updated: Friday, April 19, 2013, 10:34

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना अखेर अटक करण्यात आलीय. इस्लामामाद उच्च न्यायालयानं त्यांच्या तत्काळ अटकेचे आदेश दिले होते.

हैदराबादचा गुलाबी हिरा २१२ कोटीला विकला!

Last Updated: Thursday, April 18, 2013, 13:39

हैदराबादच्या निजामाचा ‘प्रिन्सी’ नावाचा हिरा तीन कोटी ९० लाख डॉलर म्हणजे सुमारे २१२ कोटी रुपयांना विकला गेला.

मुशर्रफ यांना अटक करा, मुशर्रफ फरार

Last Updated: Thursday, April 18, 2013, 13:25

पाकिस्तानच्या कोर्टाने माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफांना अटक करा असे आदेश दिले. मात्र मुशर्रफ आपल्या खासगी सुरक्षा रक्षकाच्या सोबतीने कोर्ट परिसरातून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

टेक्सासमध्ये खत प्रकल्पात शक्तीशाली स्फोट; ६० ठार

Last Updated: Thursday, April 18, 2013, 12:10

अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये खत प्रकल्पात शक्तीशाली स्फोट झालाय. या स्फोटात शंभर जण जखमी झाल्याची माहिती आहे.

ओबामांना आलं विषारी पत्र!

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 23:45

अमेरिकेतलं बोस्टन बॉम्बस्फोटानं हादरलं असताना आणखी एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना पाठवण्यात आलेल्या एका पत्रामध्ये रिसिन हा विषारी पदार्थ सापडलाय.

बोस्टन बॉम्बस्फोट हल्ला आणि गूढ फोटो....

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 16:13

अमेरिकेच्या बोस्टन शहरातील मॅरेथॉनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाने मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे अमेरिकेसारखं शक्तीशाली राष्ट्राच्याही सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.