‘किस क्लब’ जळून खाक; २४५ जण होरपळले!

Last Updated: Monday, January 28, 2013, 11:18

दक्षिण ब्राझिलमध्ये एका नाईटक्लबला लागलेल्या आगीत अडीचशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत २४५ जणांचे मृतदेह हाती लागलेत आत्तापर्यंत ४८ जणांना हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलंय.

कारगील युद्ध : पाकिस्तानचा आणखी एक बुरखा फाटला

Last Updated: Monday, January 28, 2013, 07:28

कारगीलची लढाई भारतीय सैनिकांनी दहशतवाद्यांशी लढून नव्हं तर पाकिस्तानी सैन्यांशी लढून जिंकल्याचं कबूल केलंय पाकिस्तानी सैन्यातील निवृत्त लेफ्टनंट जनरल शाहिद अजीज यांनी...

शाहरुखला हाफिझ सईदचं आमंत्रण

Last Updated: Sunday, January 27, 2013, 15:49

२६/११च्या मुंबई हल्ल्याचा आरोपी आणि जमात-उद-दवाचा म्होरक्या हाफिझ मोहम्मद सईद याने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा ‘९/११च्या घटनेनंतर मुस्लिम म्हणून मला काय वाटतं?’ हा लेख वाचला आणि त्याला पाठिंबा देत पाकिस्तानात येण्याचं आमंत्रण दिलं आहे.

ऑस्ट्रेलियात घुमणार मराठमोळ्या गाण्याचे बोल...

Last Updated: Sunday, January 27, 2013, 16:11

अखिल ऑस्ट्रेलिया मराठी साहित्य संमेलन सिडनी इथं २९ ते ३१ मार्चदरम्यान होणार आहे. या संमेलनाच्या निमित्तानं ऑस्ट्रेलियातल्या मराठीजनांनी एक स्वागतगीत तयार केलं आहे..

मुंबई हल्ल्याचा आरोपी हेडली याला ३५ वर्षांचा तुरुंगवास

Last Updated: Thursday, January 24, 2013, 23:41

मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा पडद्यामागचा सूत्रधार आरोपी डेव्हिड हेडलीला 35 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमेरिकेच्या शिकागो कोर्टानं हेडलीला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

शिंदेंचं वक्तव्य तालिबानच्या पथ्यावर

Last Updated: Thursday, January 24, 2013, 16:51

संघ आणि भाजपप्रणित हिंदू दहशतवादाचं खळबळजनक वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी केल्यावर आता तालिबाननेही त्यांची री ओढली आहे. काश्मीरमध्ये भाजपप्रणित हिंदू दहशतवादी संघटना कार्यरत असून संयुक्त राष्ट्रांनी त्यांचा बंदोबस्त न केल्यास आम्ही भारतातील काश्मीरवर हल्ला करू अशी धमकी तालिबानने दिली आहे.

`हेडलीनंच घडवला २६/११चा दहशतवादी हल्ला`

Last Updated: Wednesday, January 23, 2013, 13:57

लष्कर ए तोयबाचा पाकिस्तान – अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडली याचा मुंबई दहशतवादी हल्ला आणि अन्य दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आता स्पष्ट झालाय. यासाठी हेडलीला ३० ते ३५ वर्षांचा तुरुंगवास ठोठावला जावा, अशी मागणी अमेरिका सरकारनं केलीय.

सर्व भारतीय मच्छिमारांना करणार मुक्त; पाकचा निर्णय

Last Updated: Wednesday, January 23, 2013, 07:25

पाकिस्तानची सद्भाभना जागी झालीय. पाकिस्तानी तुरुंगात गेल्या कित्येक वर्षांपासून खितपत पडलेल्या सर्व भारतीय मच्छिमारांना सोडून देण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारनं घेतलाय.

बिल गेटस्... ६५ अरब डॉलरचा `बेचैन` मालक!

Last Updated: Tuesday, January 22, 2013, 16:26

वर्तमानपत्र ‘टेलीग्राफ’नं दिलेल्या माहितीनुसार बिल गेटस यांना आता पैसे कमावण्याची इच्छा उरली नाही तर आता त्यांना इच्छा आहे ती सामाजिक कार्यात सहभागी होण्याची...

मंगळावर वाहत होती नदी!

Last Updated: Monday, January 21, 2013, 17:06

मंगळ ग्रहावर एकेकाळी १,५00 किमी लांब आणि सात किमी रुंदीची महाकाय नदी वाहन होती, असे दर्शविणारी विस्मयकारी छायाचित्रे गेल्या शुक्रवारी ‘युरोपियन स्पेस एजन्सी’च्या (ईएसए) ‘मार्स एक्स्प्रेस’ या यानाने पाठविली आहेत. एजन्सीने पाठविलेले हे यान मंगळाच्या सतत प्रदक्षिणा करीत असते.