... आणि पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडलं!

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 15:20

हेग स्थित आंतरराष्ट्रीय पंचायत न्यायालयानं किसनगंगा हाइड्रो इलेक्ट्रिकल प्रोजेक्टच्या संदर्भात भारताच्या बाजूनं निर्णय दिलाय... त्यामुळे पाकिस्तानला तोंडावर पडावं लागलंय.

भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 14:18

अमेरिकेत सत्ता बदलाचे वारे जोर धरू लागले आहेत. त्यामुळे अमेरिकेत २०१६च्या निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू असून भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल यांना उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

`त्या` उल्केच्या तुकड्यांचा शोध...

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 14:03

रशियाच्या यूराल पर्वताला टक्कर देऊन एक तीव्र तरंग निर्माण करणाऱ्या उल्कापिंडेच्या तुकड्याचा शोध लावल्याचा दावा वैज्ञानिकांनी केलाय. या उल्कापातात जवळपास १२०० लोकांना जखमी केलं होतं तर हजारो घरांची पडझडही झाली होती.

पाकिस्तानकडून ‘ग्वादर बंदर’ चीनकडे सुपूर्द

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 12:17

हरमुज खाडीवरून जाणाऱ्या जहाजांच्या रस्त्यावर लागणाऱ्या ग्वादर बंदराच्या व्यवस्थापनाचा ताप पाकिस्ताननं चीनकडे सोपवलाय. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्ताननं उचललेलं हे पाऊल भारतासाठी धोकादायक ठरू शकतं.

भारतीय मुस्लिम पाकलाच साथ देतील- हाफिझ सईद

Last Updated: Monday, February 18, 2013, 17:48

लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि २६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याने पुन्हा एकदा भारताला चिथावलं आहे. हाफिझ सईदने ट्विटरवरून पुन्हा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

पाकमध्ये लष्कराकडून बॉम्बस्फोट, ८१ ठार

Last Updated: Sunday, February 17, 2013, 15:49

पाकिस्तान काल शक्तिशाली बॉम्बस्फोटांने हादरले. या स्फोटात आतापर्यंत ८१ जणांचा बळी गेला आहे. बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेट्टा शहराजवळ भीषण बॉम्बस्फोट झाला.

‘ती उल्का नव्हतीच; अमेरिकेनं केलं हत्यार परिक्षण’

Last Updated: Saturday, February 16, 2013, 15:08

वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रशियातील संसदेचे सभासद ब्लादिमीर जिरनोवस्की यांनी ‘रशियावर उल्कावर्षाव झालाच नव्हता, तर अमेरिकेनं केलेल्या स्फोटक हत्यारांच्या परिक्षणांचा परिणाम म्हणून रशियावर संकट कोसळलं’ असं म्हटलंय.

भारतीय फॅशन डिझायनर लैंगिक शोषणात दोषी

Last Updated: Friday, February 15, 2013, 23:31

भारतीय मूलतत्वाच्या अमेरिकन फॅशन डिझायनर आनंद जॉन याने मॉडेलिंगचे काम देऊन एका महिलेचे लैगिंक शोषण केल्याचा आरोपही मान्य केला आहे.

रशियात स्फोटानंतर उल्कापात, ४०० जण जखमी

Last Updated: Friday, February 15, 2013, 15:46

मध्य रशियातील युराल पर्वतरांगामध्ये शुक्रवारी पहाटे जबरदस्त स्फोट होऊन उल्कापात झाला. आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

आज दिसणार अद्भूत दृश्यं... ताऱ्यांच्या मागून धावणार प्रकाश!

Last Updated: Friday, February 15, 2013, 12:39

अवकाशप्रेमींना आज आकाशात एक अनोखं दृश्यं पाहण्याची संधी मिळणार आहे. कारण, आज रात्री आकाशातून एक लघूग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाताना तुम्हालाही दिसू शकणार आहे.