थायलंड ओपनच्या फायनलमध्ये सायना

Last Updated: Saturday, June 9, 2012, 16:43

ऑलिम्पिकवर लक्ष असलेल्या सायनानं आज आणखी एक विजय मिळवलाय. सायना नेहवालनं थायलंड ओपनच्या ‘बॅडमिंटन ग्रांप्री’च्या फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय. बँकॉकमध्ये सध्या सुरू असलेल्या टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये थायलंडच्या खेळाडू ‘पोर्नतीप बी’ला सानियानं मागे टाकलंय.

पोलंड-ग्रीस बरोबरीत, रशियाचं 'एक पाऊल पुढे'

Last Updated: Saturday, June 9, 2012, 09:08

पोलंड आणि ग्रीस यांच्यातील युरो कपची सलामीची मॅच १-१ नं बरोबरीत सुटली. गोलच्या धडाक्यापेक्षा या मॅचमध्ये यल्लो आणि रेड कार्डचा धडाका दिसला.

सानियाला ओढ 'ऑलिम्पिक वाइल्डकाईड'ची

Last Updated: Friday, June 8, 2012, 21:06

फ्रेंच ओपनमध्ये मिश्र दुहेरीत सानिया आणि भूपतीनं बाजी मारल्यानंतर सानिया मिर्झाला ओढ लागलीय ती लंडन ऑलिम्पिकच्या वाइल्डकार्ड प्रवेशाची... ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची ही सानियासाठी शेवटची संधी असेल.

युरो कपचा थरार... कोण राहणार कोण जाणार?

Last Updated: Friday, June 8, 2012, 15:58

लंडन ऑलिम्पिकपूर्वी सर्वांना वेध लागले आहेत ते युरो कप 2012 टूर्नामेंटचं...फूटबॉल वर्ल्ड कपनंतर महत्त्वाची अशी युरो कप टूर्नामेंट पोलंड आणि युक्रेनमध्ये पार पडणार आहे.

विठू नामाचा गजर अन् युरो कपचा थरार...

Last Updated: Friday, June 8, 2012, 13:07

महाराष्ट्राचा आनंद सोहळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या वारीला सुरूवात झालेली आहे. तर दुसरीकडं फूटबॉल वर्ल्ड कपनंतर महत्त्वाची अशी युरो कप टूर्नामेंट पोलंड आणि युक्रेनमध्ये आजपासून सुरू होणार आहे.

भूपती-सानियानी फ्रेंच फायनलमध्ये मारली बाजी

Last Updated: Friday, June 8, 2012, 08:47

टेनिसविश्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या महेश भूपती आणि सानिया मिर्झा या जोडीनं डबल्समध्ये विजेतेपद पटकावलं आहे.

भूपती-सानिया फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये

Last Updated: Thursday, June 7, 2012, 20:27

महेश भूपती आणि सानिया मिर्झा या टेनिस जोडीने फ्रेंच ओपनमध्ये मिक्स डबल्सच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमी फायनलमध्ये भूपती-सानियाने 6-4, 6-2 ने विजय मिळवत फायनल गाठली.

'ख्र्याक'ला फाईट ‘सित्ता’ हत्तीणीची

Last Updated: Thursday, June 7, 2012, 19:11

युरो कपच्या प्रत्येक मॅचआधी त्या मॅचचं भविष्य वर्तवणाऱ्या युक्रेनच्या ख्र्याक डुक्करला फाईट देणार आहे ती पोलंडची ‘सित्ता’ हत्तीण. सित्तानं चॅम्पियन लीगच्या मॅचेसमध्ये अचूक भविष्य वर्तवलं होतं. त्यामुळे सित्ता कोणाच्या बाजून कौल देते याबाबतही फुटबॉल फॅन्सचं लक्ष्य असणार आहे.

युरो कपचा वीनर सांगणार डुक्कर...

Last Updated: Thursday, June 7, 2012, 11:17

युरो कप २०१२ सुरू व्हायला अवघे काही तास उरले आहेत. पोलंड आणि युक्रेनमध्ये तर प्रत्येक युरो कपच्या तयारींवर शेवटचा हात फिरवला जातो आहे. या सर्व धामधुमीत युरो कपच्या प्रत्येक मॅचआधी त्या मॅचचं भविष्य वर्तवण्याकरता 'ख्र्याक द पिग' तयारीला लागला आहे.

थरार बाईक रेसिंगचा!

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 20:59

औरंगाबादेत सध्या ‘गोल्फ डर्ट ट्रैक नैशनल बाईक चैम्पियनशीप’चा थरार सुरु आहे. या स्पर्धेत देशभरातून जवळपास १७० बाईकर्सनी सहभाग नोंदवलाय. याच पद्धतीने देशभरात ५ स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत आणि यातून सर्वात जास्त गुण पटकावणारा खेळाडू बाईक रायडिंगचा नॅशनल चॅम्पियन ठरणार आहे.