Last Updated: Sunday, April 28, 2013, 07:30
मुंबई इंडियन्सने तगड्या रॉयल चॅलेंजर बंगलोरभोवती फास आवळला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेत मुंबईने 195 धावांचे तगडे आव्हान बंगलोरसमोर उभे केले. त्यानंतर बंगलोरच्या हुकमी फलंदाजांना शॉर्ट डिलिव्हरीज टाकून हैराण केले.. हे सर्व काही मुंबईने आखलेल्या योजनेनुसारच चालले होते आणि बंगलोर संघ त्यात अडकत गेला..आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवणारा बंगलोर संघाचा हुकमी एक्का ख्रिस गेलचे वादळही फेल गेले.. त्यामुळेच 195 धावांचा पाठलाग करताना त्यांच्या नाकी नऊ आले आणि मुंबईने ही लढत 58 धावांनी आरामात जिंकली