सर्वाधिक वेगवान शतक मारणारे खेळाडू

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 14:43

न्यूझीलंडच्या ऑल-राऊंडर कोरी अँडरसनने इतिहास रचला. सर्वाधिक वेगवान वनडे शतक आपल्या नावावर जमा केले आहे. त्यांने १४ सिक्स आणि ६ फोरच्या मदतीने नाबाद १३१ रन्स केल्यात. त्यांने १८ वर्षांपूर्वी १९९६ मध्ये श्रीलंके विरूद्ध खेळताना नैरोबी येथे ३७ बॉलमध्ये शतक केले होते. त्याचा रेकॉर्ड कोरीने मोडीत काढला.

कोरीचे ३६ बॉलमध्ये शानदार शतक, आफ्रिदीचा रेकॉर्ड मोडला

कोरीचे ३६ बॉलमध्ये शानदार शतक, आफ्रिदीचा रेकॉर्ड मोडला

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 11:12

न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या वन डेमध्ये ऑल राऊंडर कोरी अँडरसनने इतिहास रचला आहे. त्यांनी सर्वात जलद शतक झळकावले आहे. त्याने केवळ ३६ बॉलमध्ये १०१ रन्स केलेत.

शूमाकरवर न्यूरो सर्जरी... पण अजूनही कोमात

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 19:11

सातवेळा फॉर्म्युला वन जगज्जेतेपदाला गवसणी घालणारा माजी एफ वन ड्रायव्हर मायकल शुमाकरवर न्यूरो सर्जरी करण्यात येणार आहे. फॉर्म्युला वनला अलविदा केल्यानंतर स्केटिंगमध्ये वेगाचा थरार अनुभवणाऱ्या शुमाकरच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आणि सर्वांचा लाडका शुमी कोमात गेला.

मराठमोळ्या रहाणेनं आफ्रिका दौऱ्यात पाडली मुंबईची छाप

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 17:53

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाची पाटी कोरीच राहिली. मात्र हा दौरा फळला तो मुंबईकर अजिंक्य रहाणेला. टीम इंडियाचे दिग्गज मोक्याच्या क्षणी हातपाय गाळत असताना, रहाणेनं निधड्या छातीनं द.आफ्रिकन फास्ट बॉलिंगचे हल्ले थोपवले आणि पदरी पडणारा मानहानीकारक पराभव थोड्याफार प्रमाणात का होईना पण सुसह्य केला.

निवृत्तीनंतरचं आयुष्य इतकंही वाईट नाही, सचिनचा कॅलिसला सल्ला

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 16:55

भारतीय क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेल्या सचिननं दोन दिवसांपूर्वी निवृत्त झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सच्चा चॅम्पियन’म्हणत ज्यानं नेहमी खेळाला खेळासारखाचा खेळलं, या शब्दात कॅलिसचं कौतुक केलंय.

टीम इंडियाचा न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघ जाहीर, युवीला डच्चू

टीम इंडियाचा न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघ जाहीर, युवीला डच्चू

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 16:03

न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर झाला आहे. मात्र, धडाकेबाज युवराज सिंगला संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. तर नवोदीत स्टुअर्ट बिन्नीला वन डेमध्ये संधी देण्यात आलेय. ईश्वर पांडे यालाही वन डे संघात स्थान देण्यात आले आहे.

वेळापत्रक : ... असे असतील २०१४ मध्ये टीम इंडियाचे दौरे!

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 08:37

२०१३ या वर्षात मायदेशात शेर पण, परदेश दौऱ्यात ढेर ठरलेल्या टीम इंडियाला पुढच्या वर्षी कोणत्या सामन्यांना तोंड द्यावं लागणार आहे, हे आता स्पष्ट झालंय. टीम इंडिया २०१४ साली खेळणाऱ्या मॅचेसचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. सप्टेंबर २०१४ पर्यंतचं हे दौरे आखण्यात आलेत.

टीम इंडियानं वनडेनंतर टेस्ट सीरिजही गमावली

टीम इंडियानं वनडेनंतर टेस्ट सीरिजही गमावली

Last Updated: Monday, December 30, 2013, 21:41

डर्बन टेस्टमध्ये टीम इंडियाला मानहानीकारक पराभवाला सामोर जाव लागलं आहे. सेकंड इनिंगमध्ये भारतीय टीम इनिंग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. मायदेशात शेर ठरलेले भारतीय बॅट्समन आफ्रिकेच्या तेज तर्रार विकेटवर ढेर ठरले.

‘फॉर्म्युला-१ वर्ल्ड चॅम्पियन’ मायकल शूमाकर कोमात...

‘फॉर्म्युला-१ वर्ल्ड चॅम्पियन’ मायकल शूमाकर कोमात...

Last Updated: Monday, December 30, 2013, 09:03

सातवेळचा फॉर्म्युला- वन वर्ल्ड चॅम्पियन ड्रायव्हर मायकल शुमाकरचा स्किईंग करतांना अपघात झाला आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पॅरिसमध्ये स्किईंग करतांना त्याचा हा अपघात झाला.

‘द वॉल’ राहुल द्रविडला जॅक कॅलिसनं टाकलं मागे!

Last Updated: Sunday, December 29, 2013, 18:53

दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसनं आपल्या अखेरच्या टेस्टमध्ये ११५ रन्सची शानदार इनिंग खेळली. अखेरच्या टेस्टमध्ये सेंच्युरी ठोकणारा तो ४० वा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ठरला. तर चौथा आफ्रिकन ठरला.