बांधकाम पूर्ण होण्याआधीच पुलाला तडे

Last Updated: Wednesday, December 7, 2011, 04:42

क्रांती चौकातला उड्डाण पूल पाहून असं वाटेल की जुना पूल पाडण्याचं काम सुरूय. पण तसं नाहीये. हा उड्डाण पूल ३ वर्षांपूर्वी बांधायला सुरूवात झाली. पण बांधून पूर्ण होण्याआधीच त्याला तडे गेलेत. ही बाब सर्वप्रथम झी २४ तासनं समोर आणली.

विद्यावती आश्रमावर अखेर गुन्हा दाखल

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 05:06

पुण्यातल्या विद्यावती आश्रमातल्या गैरप्रकारप्रकरणी संचालक राजेश गुप्ताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर गुप्ता आश्रम परिसरातून गायब झालाय. झी २४ तासनं य़ा गैरप्रकाराचा सातत्यानं पाठपुरावा केल्यानं पोलीस आणि प्रशासनाला गुन्हा दाखल करणं भाग पडलंय.

पुण्याजवळील विद्यावती आश्रमाची तोडफोड

Last Updated: Friday, December 2, 2011, 10:13

कामशेतजवळील विद्यावती अनाथ आश्रमातून १२ मुलं गायब झाल्याची आणि मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याची बातमी कळताच येथील संतप्त नागरिकांनी या आश्रमाची तोडफोड केली. या संदर्भातील वृत्त झी २४ तासने प्रथम दिले होते.

बॉम्बशोधक पथकाची बोंब!

Last Updated: Wednesday, November 30, 2011, 18:30

बईत कुठं बॉम्बसदृश वस्तू असेल, वा बॉम्बचा निनावी फोन आला, तर बॉम्बशोधक पथक तातडीनं तिथं पोहोचेलच, याची कुठलीही शाश्वती देता येणार नाही. कारण सध्या बॉम्बशोधक विभागात केवळ तीनच पोलीस अधिकारी कार्यरत आहेत.

मुंबई सीएसटीची सुरक्षा धोक्यात

Last Updated: Wednesday, November 30, 2011, 03:32

मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) स्थानकाची सुरक्षा पुन्हा धोक्यात आली आहे.

राणेंचा एकाकी लढा...

Last Updated: Tuesday, November 29, 2011, 18:10

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपदी पायउतार झाल्यापासून नेहमी त्याच स्पर्धेत राहीलेले कोकणचे एक बलाढ्य नेतृत्व..पण 'कोकणाला कॉंग्रेसचा बालेकिल्ला बनवेन' अशा गर्जना करणारे नारायण राणे आजघडीला एकाकी पडल्याचं चित्र आहे.

'सद रक्षणाय' की 'सदा झोपणाय'....???

Last Updated: Sunday, November 27, 2011, 17:27

कल्याण-डोंबिवलीमध्ये पोलीस काय करत आहेत ? असा संतप्त सवाल सध्या सामान्य नागरिकांकडून विचारला जातो आहे. त्याचं उत्तर पहा झी 24 तासवर. दरोडेखोरांनी हल्ला केल्यानंतर सर्वसामान्यांनी जीवाची पर्वा न करता सामना केला.

सागरी सुरक्षा तपासणी, झी २४ तासच्या डोळ्यांनी

Last Updated: Saturday, November 26, 2011, 14:11

संपूर्ण मुंबईला हादरवणाऱ्या या विध्वंसक दहशतवादी हल्ल्याला तीन वर्ष पूर्ण झाली. सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणं राज्यातल्या प्रत्येक समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा खरोखरच वाढवण्यात आली का हे तपासून बघण्यासाठी झी चोवीस तासचे पाच प्रमुख प्रतिनिधी पाच महत्त्वाच्या सागरी किनाऱ्यावर जाऊन वस्तुस्थिती पाहण्यासाठी निघाले.

पुण्यावर विषारी संकट

Last Updated: Saturday, November 26, 2011, 12:46

गेल्या पंधरा दिवसांमध्ये पुण्यात शंभरपेक्षा जास्त घोणस सापडल्यायत. आतापर्यंत २२ जणांना सर्पदंशाच्या घटना घडल्यायत. त्यामुळे पुणेकरांनी घरातून बाहेर पडताना सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे.

अपमान... २६/११ च्या शहीदाचा

Last Updated: Saturday, November 26, 2011, 07:41

२६/११ च्या हल्ल्यात मुंबई सीएसटी रेल्वे स्थानकावर अतिरेक्यांशी लढताना आरपीएफचे जवान मुरलीधर चौधरी शहिद झाले. चौधरी यांना मरणोत्तर शौर्य पदकही मिळालेलं नाही. पेट्रोलपंप मिळवण्यासाठी चौधरींच्या विधवा पत्नीला सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतायेत.