बोगस बियाण्याचा लागवडीला फटका

Last Updated: Friday, December 23, 2011, 13:18

ठाणे जिल्ह्यातील शेतक-यांनी यंदाच्या मोसमात भात शेतीच्या पेरणीसाठी N.R.9 या नवीन जातीच्या महागड्या वाणाची लागवड केली होती.मात्र भाताचे लोम्बच न आल्याने शेतक-यांच मोठं नुकसान झालंय. या बोगस बियाण्यामुळे 325 हेक्टरवरील लागवडीचं नुकसान झाल्यानं शेतकरी संतप्त झालेत.

मृतदेहांचीही विटंबना

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 18:26

दान केलेल्या मृतदेहांची विटंबना होत असल्याचा धक्कादायक प्रकार लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उघडकीस आलाय. 'झी २४ तासच्या टीम'नं या मृतदेहांच्या विटंबनेचा हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आणलाय.

एटीएमचा 'पोरखेळ'

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 16:03

मुंबईच्या मानखुर्द भागात एटीएम लुटण्याचा प्रयत्न करणा दोन अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आलाय. रात्रीच्या वेळी मजबूत एटीएम मशीन त्या अल्पवयीन मुलांनी तोडलं होतं.

वडापाव आणि दारूचा पेग, झी २४ तासचा दणका

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 06:11

नांदेडमध्ये भरचौकात हातगाड्यांवर दारुची अवैधपणे विक्री करण्यात येते. वडापावच्या गाड्यांवर दारुची विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला. अनेक मद्यपी दारू पिऊन धिंगाणा घालतात.

हरवलेलं बालपण

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 12:07

भारतात दर मिनिटाला दोन मुलं बेपत्ता होतात. अनेक मुलं गुलामगिरीच्या अजगरी विळख्यात अजूनही अडकलेली आहेत. मुलांवर होणाऱ्या अत्याचाराची लांबलचक यादी ही भीषण आहे.

इमेजसाठी उमेदवार लागलेत वाचायला

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 12:02

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छूक उमेदवार आता कसून तयारी करत असल्यानं पुस्तकांची विक्री चांगलीच वाढलीय. मतदारांसमोर चांगली इमेज निर्माण व्हावी यासाठी, संभाषण कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, दिग्गजांची भाषणं या विषयावरील पुस्तकांना नाशकात चांगलीच मागणी वाढलीय.

विकिपीडियाची भारतीय भरारी...

Last Updated: Tuesday, January 3, 2012, 13:57

विकिपीडिया साईटमुळे कुठलीही माहिती एका क्लिकसरशी मिळते. मात्र, भारतीय भाषांमध्ये लेख देण्यास ही साईट सक्षम नसल्यानं भारतीयांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ येऊ नये यासाठी विकीपीडियानं पुढाकार घेतला आहे.

नांदेडचे रस्ते नेदरलॅंडसारखे.... वापर मात्र शून्य

Last Updated: Sunday, December 18, 2011, 04:30

परदेशातील योजनांचे अनुकरण करताना बऱ्याच वेळा आपण आपले हसे करुन घेतो, याचे उदाहरण म्हणून नांदेडमधल्या रस्ते विकास योजनकडे पाहता येईल. नेदरलँडच्या धर्तीवर कोट्यवधी रुपये खर्चून चार पदरी रस्ते बनवले खरे, मात्र ज्या हेतूसाठी ते बनवले ते हेतू पूर्ण होताना दिसत नाही.

पेट्रोल कंपन्यांवर भेसळीबद्दल संशय

Last Updated: Saturday, December 17, 2011, 11:28

पुण्यात होणाऱ्या पेट्रोल चोरी आणि भेसळीनंतर संशयाची सुई पेट्रोल कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे जातेय. पेट्रोल वाहतूक करणाऱ्या सर्वच टँकर्सना अत्याधुनिक लॉक आहेत. त्याच्या फक्त दोन चाव्या असतात. त्यापैकी एक चावी ही संबंधित पेट्रोल कंपन्यांकडे आणि दुसरी पेट्रोल पंप डीलर्सकडे असते.