RPIच्या २६ जागांवर शिक्कामोर्तब

Last Updated: Tuesday, January 10, 2012, 17:44

शिवसेना आरपीआय महायुतीच्या कोट्यातल्या जागावाटपाची पहिली यादी बाहेर पडलीय. झी २४ तासच्या हाती शिवसेना-भाजपनं आरपीआयला सोडलेल्या २६ वॉर्डची लिस्ट लागलीय. गेल्या काही दिवसांपासून आठवलेंच्या तीस जागांची मागणी आणि त्यात दलित पॅथरचा दावा यामुळे आरपीआयला कोणते वॉर्ड मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागल होतं.

मुंबईत पुन्हा एकदा... समुद्री तस्करी

Last Updated: Sunday, January 8, 2012, 18:13

परदेशातुन समुद्रमार्गे येणारा करोडो रुपयांचा माल लंपास केला जातो,हे उघडकीस आल आहे. मुंबई बंदरापासुन काहीच अंतरावर छोट्या छोट्या बोटींवरुन या मालाची चोरी केली जाते आहे. ही चोरी कस्टम,पोलीस आणि जहाजाचं कॅप्टनचं संगनमत असल्याशिवाय होऊ शकत नाही.

अनोख्या लग्नाची गोष्ट

Last Updated: Saturday, January 7, 2012, 12:48

किडनी खराब झाल्यामुळे डायलिसीसच्या असाह्य दु:खाचे वाटेकरी असलेले दोघे रुग्ण चक्क विवाहबंधनात अडकल्याची सुखद घटना जळगावात घडली. पतीला बहिणीकडून तर पत्नीला आईकडून किडनी दान मिळाल्यानं दोन जीवांची नवी पहाट उदयास आली आणि एका अनोख्या लग्नाची गोष्ट झाली.

मुंबई डबेवाल्यांची कार्यपद्धती पुस्तकात

Last Updated: Saturday, January 7, 2012, 09:28

मुंबईचे डबेवाले इथल्या रोजच्या जिवनाचा एक अविभाज्य भाग बनलेत. मॅनेजमेंट गुरू म्हणून डबेवाल्यांना ओळखलं जातं. डबेवाल्याच्या या अविरत सेवेचा एल के शर्मा यांच्या 'द इंडिया आयडीया', 'हेराल्डींग द एरा ऑफ पाथ ब्रेकिंग इनोव्हेशन्स' या पुस्तकात गौरव करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय़ पातळीवर दखल घेण्यात आलेल्या डबेवाल्याच्या कार्यपद्धतीवर या पुस्तकात विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे.

मोबाईलवर आता रेल्वे तिकीट बुकींग

Last Updated: Wednesday, January 4, 2012, 13:40

रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी आता तुम्हाला रांगेत ताटकळत रहावे लागणार नाही. तसेच एजंटकडेही बुकींगसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार नाही. कारण भारतीय रेल्वेने आता मोबाईलवर तिकीट बुकींग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

झी २४ तासचा दणका, बोगस खत विकणारा गजाआड

Last Updated: Tuesday, January 3, 2012, 19:43

बनावट आणि विना परवाना खत विक्री करणाऱ्या एका आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचं उस्मानाबादमध्ये उघड झालं आहे. उस्मानाबादमधल्या अंबेजवळगा परिसरातल्या शेतकऱ्यांनी बनावट खत विक्रेत्याला पकडून दिले मात्र उस्मानाबाद पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यानं त्याला सोडून देण्याचा प्रयत्न केला.

शरद पवारांच्या नजरेतून बातम्यांचा ओघ

Last Updated: Friday, December 30, 2011, 17:05

आज झी २४ तासचे गेस्ट एडिटर श्री. शरद पवार यांनी एडिटर पदाचा पदभार स्विकारल्यानंतर आजच्या बातम्यांचा प्रवास हा त्यांच्या दृष्टीकोनातून सगळ्यांसमोर येईल. तसंच झी २४ तासच्या www.24taas.com या वेबसाईटवरील बातम्यांचा ओघ कश्याप्रकारे असेल यावर देखील शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं.

राष्ट्रगीताची शतकपूर्ती

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 13:55

ज्यादिवशी अण्णांची भ्रष्टाचार विरोधी चळवळ ऐतिहासिक वळण घेत होती, त्याच दिवशी योगायोगाने आपलं राष्ट्रगीताने शतक गाठलं. ‘जन गण मन’या भारतीय राष्ट्रगीताला काल २७ डिसेंबर रोजी १०० वर्षं पूर्ण झाली.

शेतक-यांनी कर्जमाफी नाकारली

Last Updated: Saturday, December 24, 2011, 16:18

इंदापूर तालुक्यातील शेतक-यांनी कर्जमाफी नाकारलीये...हा अजब दावा केलाय सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याच तालुक्यातल्या इंदापूर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेने. कर्जमाफीची रक्कम नेण्यासाठी एकही शेतकरी आला नसल्याचा दावा करत बँकेनं तब्बल सात कोटी ७१ लाख ३३ हजार रुपयांची रक्कम सहकार खात्याला परत पाठवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय.

थर्टीफर्स्टचे वेध, कोकण फु्ल्ल

Last Updated: Saturday, December 31, 2011, 08:45

कोकणाच्या पर्यटनाला आता नाताळ आणि थर्टीफर्स्टचे वेध लागले आहेत.गोव्याबरोबरच विदेशी पर्यटकांनी यावर्षी कोकणाला पसंती दिली आहे. रत्नागिरी आणि सिधुदूर्ग मिळून सुमारे तीन लाख पर्यटक कोकणात येत असून एम.टी.डी.सी.सह खासगी रिसॉर्टची आरक्षणं फूल झाली आहेत.