Last Updated: Tuesday, June 11, 2013, 15:06
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली याला अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येप्रकरणी १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय.
सूरजनं पाठवलेल्या अपमानास्पद एसएमएस आणि जिया खाननं लिहिलेल्या पत्राच्या आधारे पोलिसांनी सोमवारी सूरजला अटक केली होती. जियाच्या आत्महत्येसाठी सूरज आणि आदित्य हे जबाबदार असल्याचा आरोप जियाच्या आईनं केला होता. जिया खाननं आत्महत्येपूर्वी लिहिलेलं सहा पानी पत्रं तिच्या आईनं पोलिसांकडे सोपवलं होतं. या पत्राच्या मजकुरात थेट कुणाचं नाव घेतलेलं नसलं तरी रोख सूरज पांचोलीकडेच असल्याचं समजतंय.
सूरजनं केलेल्या प्रतारणेनंतर जियानं जुहूमधल्या आपल्या राहत्या घरी गळफास लावून आपलं जीवन संपवलं होतं.
a href="https://www.facebook.com/Zee24Taas ">
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 11, 2013, 15:04