जिया-सुरजच्या नात्याबद्दल माहितीच नव्हती तर, I was unaware of Jiah Khan-Suraj Pancholi`s affair, says Salman Khan

जिया-सुरजच्या नात्याबद्दल माहितीच नव्हती तर...

जिया-सुरजच्या नात्याबद्दल माहितीच नव्हती तर...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

‘जिया खान आणि सूरज पांचोली यांच्या प्रेमसंबंधांबद्दल मला माहितीच नव्हती, माझं नाव उगाचच या प्रकरणात गोवण्यात येतंय’ अशी भूमिका अभिनेता सलमान खान यानं घेतलीय.

‘आदित्य पांचोली यांना जिया आणि सूरजचे नातेसंबंध पसंत नव्हते. जेव्हा त्याला त्यांच्या संबंधांबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्याला खूप राग आला होता. त्यानंतर त्यांनी जिया-सूरज यांचे संबंध तोडण्याचा पूरेपूर प्रयत्नही केला. सलमान आणि आदित्य खास मित्र आहेत. त्यामुळे आदित्यच्या सांगण्यावरून सलमाननंही सूरजला जियाशी असलेले संबंध तोडून लांब राहण्याचा सल्ला दिला होता’ असं राबिया खान यांनी म्हटलं होतं. सोबतच सूरजनं आपण जियावरच प्रेम करत असल्याचं सांगितल्यानं नंतर सलमाननं हा नाद सोडून दिल असंही त्यांनी म्हटलं होतं. याचबद्दल मीडियानं सलमानचं नाव पुढे आणल्याबद्दल सलमानला प्रचंड राग आलाय.

`अभिनेत्री जिया खान आणि सूरज पांचोली यांच्या प्रेम संबंधांबद्दल मला काहीही ठाऊक नव्हतं. मग त्यांच्या ब्रेकअपसाठी मी मध्यस्थी करण्याचा प्रश्नच कुठे येतो? या प्रकरणात माझं नाव विनाकारण गोवलं जातंय. मला माझं आयुष्य आहे, माझे प्रॉब्लेम्स आहेत. इतरांच्या आयुष्यात डोकावून त्यांच्या समस्या सोडवायला माझ्याकडे वेळ नाही. जियाच्या बाबतीत जे झालं, ते अत्यंत दुःखद आहे. तिच्या कुटुंबीयांबद्दल मला सहानुभूती वाटते. पण, जियाच्या आईनं माझ्यावर केलेले आरोप तथ्यहीन आणि क्लेषदायक आहेत’ असं म्हणत एकप्रकारे सलमाननं राबिया खान खोटं बोलत असल्याचंच म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 18, 2013, 12:24


comments powered by Disqus